Viral video: साधारणपणे सर्व मुले त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ असतात. बहुतांश मुलं प्रत्येक गोष्ट पालकांसोबत शेअर करतात. त्यामुळे सोबतच मुलं पालकांसोबत मजा-मस्करी करायलाही मागेपुढे पाहत नाहीत तसेच काही त्यांची खूप चेष्टाही करतात.असाच एका व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ज्यात वडिलांसमोर दारू पिण्याचं नाटक करणे तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. वडिलांसोबत प्रँक करणाऱ्या तरुणासोबत नेमकं काय घडलं? तुम्हीच बघा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण आपल्या वडिलांसोबत मस्करी करत आहे. वडिल सोफ्यावर बसून टीव्ही पाहात होते. त्याचवेळी हा मुलगा दारूची बाटली घेऊन वडिलांच्या पायाखाली बसला. पण असं दाखवत होता की तो लपून दारू पितोय. अर्थात ही बाब वडिलांनी पाहताच ते भडकले. आणि त्यांनी मुलाची धुलाई करण्यास सुरूवात केली. मुलगा हा प्रँक होता हे वारंवार सांगत राहिला. पण वडील काही ऐकण्यास तयार नव्हते. शेवटी मुलानं रेकॉर्ड केलेले व्हिडीओ दाखवला तेव्हा कुठे वडील थांबले.पण या मुलाच्या वडिलांनी ज्या प्रकारे त्याची धुलाई केली. ते पाहून तु्म्हालाही हसू अनावर होईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Viral Video: बेडवर झोपण्यासाठी गेला व्यक्ती; विचित्र आवाज आल्याने गादी उचलताच बसला धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान हा व्हिडीओ ss_king746 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत एक कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहे. भावा, एक मिनिट उशीर झाला असता तर तुझं काही खरं नव्हतं, तू मृत्युच्या दारातून परत आला, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर, प्रँक करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा, कधी- कधी प्रँक असे प्रँक करणे अंगलट येऊ शकतात. अशा या व्हिडिओवर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या जात आहे