बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरलेला भोंदूबाबा राम रहिम याची मुलगी हनीप्रीत फरार असून पोलीस सध्या तिच्या मागावर आहे. हरयाणा पोलिसांनी १ सप्टेंबर रोजी हनीप्रीतला देश सोडून जाण्याची बंदी घालण्यासाठी नोटीस काढली होती. तेव्हापासून हनीप्रीत फरार आहे. हनीप्रीत ही राम रहिमची दत्तक मुलगी असल्याचे सांगितले जाते. गळ्यात ‘पापा की परी’ असं लॉकेट घालून मिरवणारी हनीप्रीत नेमकी आहे तरी कोण? तिचा भूतकाळ काय? याबद्दल अनेक चर्चांना उधाण आलाय. तर या हनीप्रीतचं खरं नाव आहे प्रियंका तनेजा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरयाणामधल्या जगजीवन पुरामध्ये २१ जुलै १९८० साली तिचा जन्म झाला. ‘आज तक’ने दिलेल्या माहितीनुसार तिचा जन्म एका सधन कुटुंबात झाला होता. तिचे वडिल रामानंद तनेजा व्यावसायिक होते. फतेहबादमध्ये एका छोट्याशा घरात हे कुटुंब भाड्याने राहत होते. व्यवसायात जम बसल्यानंतर तनेजा कुटुंबानं स्वत:चं घर खरेदी केलं. तनेजा कुटुंब हे फतेहबादमधलं प्रतिष्ठित कुटुंब होतं. १७ वर्षांपूर्वी तनेजा कुटुंबाने फतेहबाद सोडलं. त्यानंतर हे कुटुंब डेरामध्ये राहू लागलं. पुढे या कुटुंबाचं काय झालं याची कल्पना कोणालाही नाही. त्यानंतर कोणीही या कुटुंबाला पाहिलं नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All you need to know about ram rahim adopted daughter honeypreet insan
First published on: 11-09-2017 at 10:19 IST