US Man Spends Rs 1.35 Cr On Surgery To Increase Height : कमी उंचीमुळे अनेकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा मित्र मंडळींमध्ये कमी उंचीमुळे खूप खिल्ली उडवली जाते. पण आम्ही तुम्हाला आज एका अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याने उंची वाढवण्यासाठी चक्क १.४ कोटी रुपये खर्च केले आहेत. यापूर्वी या व्यक्तीची उंची ५ फूट ५ इंच एवढी होती. पण शस्त्रक्रियेनंतर त्याची उंची अजून वाढली आहे. कमी उंचीमुळे या व्यक्तीला गर्लफ्रेंड मिळत नव्हती, त्यामुळे त्याच्या मनात एकप्रकारे न्यूनगंड निर्माण झाला होता.

उंची वाढवण्यासाठी या व्यक्तीने दोन वेळा वेदनादायक शस्त्रक्रिया केल्या. शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या या व्यक्तीचे नाव मोझेस गिब्सन असे असून तो अमेरिकाचा रहिवासी आहे. द कॉस्मेटिक लेनने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने शस्त्रक्रिया करून आपली उंची कशी वाढवली हे सांगतले आहे.

weight loss surgery youth dies
१५० किलो वजन, स्लीम होण्याचं स्वप्न; पण २६ वर्षीय तरुणानं शस्त्रक्रिया करतानाच गमावला जीव
tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
Bhastrika Pranayama
Bhastrika Pranayama VIDEO : स्वत:ला उत्साही ठेवण्यासाठी चहा किंवा कॉफी घेताय? त्यापेक्षा नियमित करा भस्त्रिका प्राणायाम
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

गिब्सनला डेटिंग लाइफबद्दल सतावतेय चिंता

मोझेस गिब्सनची शस्त्रक्रियेपूर्वीची उंची ५ फूट ३ इंच होती. २०१६ मध्ये त्याने उंची वाढवण्यासाठी पहिल्यांदा शस्त्रक्रिया करू घेतली. त्यामुळे त्यांची उंची तीन इंचांनी वाढून ५ फूट ५ इंच झाली आहे. यावेळी तो आणखी एका शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेतून जात आहे. यानंतर त्याची उंची २ इंचांनी वाढून ५ फूट १० इंचांपर्यंत वाढेल असे सांगितले जात आहे.

या व्हिडिओमध्ये गिब्सने सांगितले की, कमी उंचीमुळे त्याची डेटिंग लाइफ उद्ध्वस्त होत होती. यामुळे शस्त्रक्रियेपूर्वी त्याने उंची वाढवण्यासाठी अनेक औषधे घेतली. एवढेच नाही तर या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याने अनेक डॉक्टरांची मदतही घेतली.

शस्त्रक्रियेसाठी त्याने रात्रभर गाडी चालवत कमावले पैसे

सर्व प्रयत्न करूनही जेव्हा गिब्सनची उंची वाढत नव्हती तेव्हा त्याने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, पण ही शस्त्रक्रिया खूप महागडी होती. पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्याने दिवसा सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम केले आणि रात्री उबेर कार चालक म्हणून काम केले. अशाप्रकारे तीन वर्षांत त्याने ६०,७८९३८ रुपयांची व्यवस्था केली. २०१६ मध्ये पहिली शस्त्रक्रिया केल्यानंतर दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी त्याने ८०,२०,८५९ रुपये खर्च केले आहेत.

शस्त्रक्रियेनंतर त्याची उंची २ इंचांनी वाढेल, अशी त्याला आशा आहे. त्यांनी सांगितले की, पहिल्या शस्त्रक्रियेनंतर मला महिलांशी बोलण्यात जो संकोच वाटायचा तो आता संपला आहे. गिब्सनची आता एक गर्लफ्रेंडही आहे. द कॉस्मेटिक लेनच्या मते, गिब्सनची उंची वाढवण्यासाठी त्याच्या टिबिया आणि फॅब्युलाची हाडे मोडली गेली आणि नंतर स्क्रूने जोडली गेली. त्याच्या शस्त्रक्रियेनंतर, मोझेस आता दिवसातून तीन वेळा उंची वाढवणारे उपकरण वापरतो. जे एका वेळी एक मिलिमीटर कापलेल्या हाडांना हळूहळू वेगळे करते.

ही प्रक्रिया त्याच्या शरीराला नवीन हाडांच्या ऊती तयार करण्यास प्रोत्साहित करते, ज्यामुळे हाडांच्या फ्रॅक्चरमुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघते. यानंतर मोझेस उंची ५ फूट १० इंच वाटेल.