34 Year Old Marries 80 Year Old Reel Star: प्रेमाला रंग, रूप, जात-धर्म, पैसे, श्रीमंतीची भुरळ नसते असं म्हणतात. प्रेम हे प्रेम असतं, आणि कधी कधी तुमचं आमचं सेम नसतं! अशाच एका जगावेगळ्या प्रेमाची गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. मध्यप्रदेशाच्या मालवा जिल्ह्यात मगरीया गावची प्रेमकहाणी व्हिडीओच्या माध्यमातून जगात गाजतेय. एका ८० वर्षांच्या इसमाच्या प्रेमात पडलेली ३४ वर्षीय महिला आपलं घरदार सोडून मगरीया गावी आली होती. हा ८० वर्षीय नवरदेव एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून त्याच्या अनेक रील्स व्हायरल होत असतात. ३४ वर्षीय महिला सुद्धा याच रीलवर भाळली होती. या जोडप्याची प्रेमकहाणी जी सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे तिची सुरुवात कशी झाली पाहूया..

पहिल्या पत्नीचं निधन झालं आणि आयुष्य बदललं..

८० वर्षीय बालूराम यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले झाल्यावर त्यांना एकटेपण जाणवत होते. कुटुंब म्हणून त्यांना एका मुलगा व तीन मुली होत्या पण प्रत्येकाचं लग्न झालं असल्याने सर्वच वेगळे राहत होते. या एकटेपणात डोक्यावरील कर्ज आणखी ताण वाढवत होतं. सतत चिंताग्रस्त असल्याने त्यांची प्रकृती सुद्धा बिघडली होती. यानंतर गावातील एक तरुण विष्णू गुर्जरशी त्यांची मैत्री झाली. या दोन मित्रांनी मिळून गावात एक चहाचं दुकान सुरु केलं होतं. एकदा मस्करीतच विष्णूने बालूरामची एक रील बनवली होती. काहीच दिवसात बालूरामची रील इतकी व्हायरल झाली की त्यांना आजूबाजूच्या गावांमधून सुद्धा लोक त्यांना नावाने ओळखू लागले. बालूरामचे आयुष्य असे बदलले की आज पैसे, पत्नी, प्रतिष्ठा सगळं त्यांच्या दाराशी आलं आहे.

हे ही वाचा<< हिंदू मंदिरात पुजारी होण्यासाठी मुस्लिम विद्यार्थी घेतायत संस्कृतचे धडे? Video तुन सावधानतेचा इशारा पण? खरं..

बालूरामच्या प्रेमात पडली आणि ६०० किमी..

बालूरामला स्वतःला मोबाईल वापरता येत नाही. आता रील बनवण्यासाठी विष्णूच त्यांची मदत करतो. सोशल मीडियावरच बालूराम यांची महाराष्ट्रातील अमरावतीच्या शीला इंगोले यांच्याशी ओळख झाली. दोघांची मतं आणि मनं जुळून त्यांच्यात मैत्री आणि प्रेम वाढू लागले. गप्पांमधून वाढलेलं प्रेम मग अशा टप्यापर्यंत पोहोचलं की, शीला बालूराम यांना भेटण्यासाठी ६०० किलोमीटर दूर निघून आली. १ एप्रिलला सोमवारी सूसनेर येथील कोर्टात लग्न केले. न्यायालयाच्या आवारात असणाऱ्या मंदिरात एकमेकांच्या गळ्यात हार घालून त्यांनी हिंदू रीती रिवाजांनुसार लग्न केले. इंडिया टीव्हीशी बोलताना दोघांनीही या लग्नामुळे आयुष्यात आनंद आल्याचे म्हटले आहे.