RPG समुहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. सोमवारी त्यांनी एक्सवर ग्वाल्हेरच्या महाराजांच्या राजवाड्यातील राजेशाही जेवणाटा थाट दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे. राजवाड्यामध्ये महाराजांना कशा प्रकारे जेवण वाढले जाते हे या व्हिडीओमध्ये दाखवले आहे. हा मनोरंजक व्हिडिओ नेटकरी अवाक् झाले आहे. व्हिडिओमध्ये जेवणाचा टेबल खाद्यपदार्थांनी सजवलेला आहे. तुम्हाला हे पाहून आश्चर्य वाटेल की, टेबलावर एक टॉय ट्रेनही दिसत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जेवणाच्या टेबलावर टॉय ट्रेन कशाला? तर तुम्ही टिव्हीमध्ये जेवणाच्या टेबलावरून फिरणारी टॉय ट्रेन पाहिली असेल ज्यावर विविध खाद्यपदार्थ ठेवलेले असतात. भल्या मोठ्या टेबलावर ही ट्रेन फिरत असते. ही टॉय ट्रेनही तशीच आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की कशाप्राकारे जेवणाच्या भल्या मोठ्या टेबलावर एक छोटीशी ट्रेन धावताना दिसत आहे. टॉय ट्रेनला छोटे डब्बे जोडले आहेत ज्यामध्ये विविध खाद्यपदार्थ ठेवले जातात. नीट पाहिले तर तुम्हाला प्रत्येक डब्यावर इंग्रजी वर्णमालतील अक्षरे दिसतील जी जोडल्यानंतर SINDIA असा शब्द तयार होतो. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ही ट्रेन कशी काम करते दाखवत आहे. ट्रेनमधील एका डब्यातून एक भांडे उचलतो त्यानंतर ती ट्रेन तिथेच थांबते. काही क्षणांनी तो ते भांडे टॉय ट्रेनच्या डब्यात ठेवतो आणि ट्रेन पुन्हा धावू लागते. टेबलवर अत्याधुनिक दिसणाऱ्या काचेच्या स्टँडमध्ये मेणबत्त्या पेटवल्याचेही दिसते. तसेच काचेच्या भाड्यांमध्ये विविध खाद्यपदार्थ ठेवल्याचेही दिसते. व्हिडीओ पाहून नेटकरी चकीत झाले आहे.

हेही वाचा – चीनमध्ये आता तळहात स्कॅन करून दिले जातात पैसे! ‘Palm Payment’चा व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले

व्हिडिओ शेअर करताना गोयंका यांनी लिहिले, “ग्वाल्हेरच्या राजवाड्यात महाराजांना जेवण कसे वाढले जाते!”

व्हिडीओ पाहून लक्षात येते की, ग्वाल्हेरच्या राजवाड्यात महाराजांना जेवण वाढण्यासाठी जेवणाच्या टेबलावर टॉय ट्रेन बसवण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये विविध खाद्यपदार्थ ठेवण्यात येतात. संपूर्ण टेबलावर ट्रेनचा छोटासा रुळही बसवलेला दिसतो. या रुळावरून ट्रेन धावताना दिसते. ट्रेनच्या डब्यांमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थाचे भांडे उचलताच ती ट्रेन थांबते.

व्हिडिओला प्लॅटफॉर्मवर ३,६०,०००पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. व्हिडीओ पाहून एकाने लिहिले, “सर!! श्रीमंत असणे म्हणजे आलिशान सुंदर निर्मितीमध्ये राहणे,” तर दुसरा म्हणाला,. “एखाद्या पाहुण्याने साखळी ओढली तर? असे दुसऱ्याने लिहिले,

“राजू चाचाच्या राजवाड्यात असेच जेवण दिले जात होते,” असे तिसऱ्या चित्रपटाचा संदर्भ देत सांगितले. वर्ष २०००मध्ये प्रदर्शित झालेला अजय देवगण आणि काजोलचा चित्रपट ‘राजू चाचा’मध्ये जेवणाच्या टेबलावर धावणारी टॉय ट्रेन दाखवण्यात आली होती.

हेही वाचा – बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या महिन्यात, अहमदाबादमधील ‘रोबोटिक कॅफे’ नावाच्या पॉप-अप ट्रकमध्ये जेवण देण्याच्या आणखी एका असामान्य पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये सर्व्हिंग ट्रेसह एक रोबोट ग्राहकांना बर्फाचा गोला सर्व्ह करताना दिसत होता. रिपोर्ट्सनुसार, रोबो – खास बर्फाचे गोळा देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत ज्यांची किंमत सुमारे १.३५ लाख रुपये आहे. आयशा असे या रोबोटचे नाव आहे.