Viral Video: महाराष्ट्रासह देशातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक म्हणजे केळी. पिवळ्या आणि हिरव्या रंगाची केळी बाराही महिने उपलब्ध असतात. कच्च्या केळीसह पिकलेल्या केळीचेसुद्धा अनेक पदार्थ बनवले जातात. कारण केळी आरोग्यासाठी एक आवश्यक फळ आहे, जे पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. पण, बाजारात नेहमीच आपल्याला पिकलेली केळी मिळत नाही. अशा स्थितीत बाजारात ठेवलेल्या केळ्यांवर केमिकल मिसळण्याची भीती जास्त असते. तर आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यात एका वृद्ध महिलेने (आजीने) कच्ची केळी केवळ दोन दिवसांत कशी चांगली पिकवता येतात आणि चव कशी पूर्णपणे नैसर्गिक राहते याची सोपी ट्रिक दाखवली आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये असे म्हटले आहे की, केळी कोणत्याही रसायनाशिवाय चांगली पिकवता येतात. केळी झाडावर पिकायला वेळ लागतो. केळीच्या रोपाला पालवी फुटल्यापासून ते कापणी होईपर्यंत १०० ते १२० दिवस लागतात, तर फळांच्या तुलनेत केळी लवकर पिकतात. पिकलेल्या केळ्यांचे शेल्फ लाइफ जास्त नसते. कच्ची केळी जास्तीत जास्त चार ते पाच दिवस चांगली राहतात आणि त्यानंतर ती खराब होण्यास सुरुवात होतात. अशा वेळी केळ्यांचे शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी, केळीचे घड झाकून ठेवणे गरजेचे असते. तर आजीबाईंची हीच ट्रिक व्हिडीओत दाखवली आहे, जी तुम्हीसुद्धा एकदा बघा.

हेही वाचा…‘कधीही हार मानू नका!’ आईचा प्रवास पाहून IFS अधिकाऱ्यांनी सांगितले जीवनाचे ‘पाच’ धडे; पाहा पोस्ट

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, दक्षिण भारतीय आजीने एका अज्ञात व्यक्तीच्या मदतीसह, कच्ची केळी पुरण्यासाठी जमिनीत खड्डा खणला. नंतर त्यात केळी ठेवली. त्यानंतर खड्ड्याभोवती केळीची पाने आणि एका डब्यात निखारे घालून त्याच्या शेजारी ठेवले. खड्ड्याचा उरलेला भाग वरपर्यंत चांगला झाकून घेतला आणि त्यावर माती टाकली. दोन दिवस कच्च्या केळीचा घड आतमध्ये ठेवून दिला. दोन दिवसांनंतर पाहिल्यावर बाहेर काढलेल्या केळीचा घड पूर्णपणे पिकलेला असतो. आजी व्हिडीओत एक केळंसुद्धा चाखून दाखवते. केळी पिकवण्याची ही नैसर्गिक पद्धत खूपचं चांगली आहे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @countryfoodcooking या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘केळी पिकण्याची नैसर्गिक पद्धत’; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. पण, नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. काहींना आजीबाईंची ही ट्रिक आवडली असून काही जण मात्र यावर अनेक प्रश्न विचारताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत .