Motivational Quotes Anand Mahindra : प्रत्येक माणूस, मग तो कितीही मोठ्या यशाच्या शिखरावर पोहोचलेला असो, त्याने आयुष्यात कधी ना कधी अपयशाचा सामना केलेलाच असतो. संकटं, ताणतणाव आणि अपयश या आयुष्याचा भाग आहेत. पण अशा वेळी मनोबल खचू न देता जो पुन्हा उभा राहतो तोच यशस्वी होतो. तुम्ही आयुष्याच्या अशा टप्यावर असाल जिथे तुम्हाला सगळं संपल्यासारखं किंवा हरल्यासारखं वाटत असेल तर तुमचे मनोबल वाढवणारा सल्ला महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी दिला आहे. त्यांच्या ४४ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून मंहिद्रा जे शिकले आहेते त्याबाबत त्यांनी सर्वांना मोलाचा सल्ला दिला आहे जो आज लाखो लोकांना आशा आणि धैर्य देत आहे.
आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. कधी मजेशीर व्हिडिओ शेअर करतात तर कधी सामाजिक मुद्यावर आपले मत व्यक्त करतात. आनंद महिंद्रा यांनी एक्सवर (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “माझ्या कारकिर्दीला आता ४४ वर्षे झाली आहेत. या काळात एक गोष्ट शिकलो ती म्हणजे येथे काहीही कायमचे नाही. अडचणी, दबाव, अपयश – ते सर्व काही एक दिवस निघून जाईल. जेव्हा तुम्ही वादळाच्या मधोमध अडकलेले असता तेव्हा त्यांना असे वाटते की, ते कधीही संपणार नाही, परंतु ते संपते.”
आनंद महिंद्रा यांचा मोलाचा सल्ला (Valuable advice from Anand Mahindra)
त्यांनी पुढे लिहिले की, ताण तुमची ऊर्जा कमी करतो. त्याचा काही उपयोग नाही. फक्त तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करत रहा, चिकाटी ठेवा आणि काळ बदलेल यावर विश्वास ठेवा, कारण तो नेहमीच बदलतो. महिंद्रांचा संदेश केवळ शब्द नाही तर आजच्या अनिश्चितता, दबाव आणि अपयशांशी झुंजणाऱ्या लाखो तरुणांसाठी आणि व्यावसायिकांसाठी आशेचा किरण आहे.
वादळही एक दिवस थांबते…
या पोस्टनंतर सोशल मीडियावर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. एका वापरकर्त्याने लिहिले, सर, तुमचा संदेश हृदयस्पर्शी आहे. अवघड काळातील तुमचा अनुभव प्रेरणादायी ठरतो आहे. दुसऱ्याने म्हटले, जेव्हा मी वाईट काळात असतो तेव्हा हे शब्द ऐकून वाटते कोणीतरी बरोबर आहे.
आनंद महिंद्रा त्यांच्या प्रेरक विचारांसाठी खूप लोकप्रिय आहेत. त्या अनेकदा सोशल मीडियावर तिचे विचार आणि कथा शेअर करतात, ज्या तिच्या साधेपणा, अनुभव आणि सकारात्मकतेचे प्रतिबिंबित करतात. ते अनेकदा आपले विचार आणि कथा सोशल मीडियावर शेअर करतात, ज्यावरून त्यांच साधेपणा, अनुभव आणि सकारात्मकता दिसून येते. या पोस्ट मध्ये त्याने सांगितली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तो म्हणजे कोणतीच गोष्ट कायम टिकत नाही. बदल होणे अटळ आहे. हे जीवनाचे सर्वात मोठे सत्य आहे. ते तणाव असो, वाईट वेळ असो किंवा थकवा असो, ते कायम राहात नाही.