Pillow Fight Championship: काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील फ्लोरिडा येथे जगातील पहिल्याच ‘पिलो फाइट लीग’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रतियोगितेमध्ये १६ पुरुष आणि ८ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आता देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ शेअर करून या स्पर्धेचा आनंद लुटला आहे. या खेळाचा आनंद घेत आनंद महिंद्रा यांनी स्वत:ला या खेळाचा स्टार खेळाडू म्हटले आहे.

आनंद महिंद्रा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे, “मी अजून एक लीग सुरु करत नाही आहे. प्रो कबड्डी लीग सुरू करणे खूप समाधानकारक आहे. परंतु या लीगसाठी स्टार खेळाडू म्हणून लिलावासाठी मी स्वत:ला ऑफर करत आहे. माझ्या ४ वर्षाच्या नातवांसोबत सुट्टी घालवल्यानंतर मला वाटतं मी फिट आहे आणि हा खेळ खेळण्यासाठी तयार आहे.” आनंद महिंद्रा यांनी स्वत:साठी ५० हजार रुपयांची सुरुवातीची बोली लावली आहे.

Bappi Lahiri : मुंबई पोलिसांनी अनोख्या अंदाजात बप्पी लहरींना वाहिली श्रद्धांजली; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

पाणीपुरी खाऊन कमी करता येणार वजन? समोर आली आश्चर्यकारक माहिती

ही स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूंना ५ हजार डॉलर्स म्हणजे ४ लाख रुपये आणि विजेतेपद बक्षीस म्हणून देण्यात आले. मात्र, जेव्हा त्याचे व्हिडिओ समोर आले तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. घराघरांत खेळला जाणारा हा खेळ व्यावसायिक कधी झाला आहे, असे लोक म्हणत आहेत.

सध्या पहिली पिलो फाईट चॅम्पियनशिप पाहिल्यानंतर त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. हा खेळ खेळण्यासाठी खेळाडूंमध्ये ताकद, रणनीती आणि तग धरण्याची क्षमता असणे अत्यंत आवश्यक आहे. पिलो फाईट चॅम्पियनशिपचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. लोकांना हे व्हिडिओ खूप आवडत आहेत.