उद्योगपती आनंद महिंद्रा यांना कोण ओळखत नाही? दररोज ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर काही ना काही व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करत असतात. सोशल मीडियावर आनंद महिंद्रा कायम सक्रिय असतात. आनंद महिंद्रा युजर्सना त्यांना विचारलेल्या प्रश्नांची बऱ्याचदा उत्तर देत असतात. काही दिवसांपूर्वी तुम्ही पंजाबी आहात का सर? असा प्रश्न एकाने महिंद्रांना विचारला होता. या ट्वीटला महिंद्रांनी दिलेलं उत्तर चांगलंच व्हायरल झालं होतं. त्यानंतर प्रश्न विचारणाऱ्याने त्याचं ट्वीटच डिलीट केलं होतं. तर एका युजर्सने आनंद महिंद्रा यांना स्वतःच्या कंपनीने बनवलेल्या गाड्यांशिवाय इतर कंपनीच्या गाड्या चालवतात का? असा प्रश्न विचारला होता. त्याच्या या प्रश्नाला महिंद्रांनी भन्नाट उत्तर दिलं होते. “म्हणजे महिंद्रा व्यतिरिक्त इतर गाड्या आहेत, असं तुला म्हणायचंय का? मला कल्पना नव्हती. (चेष्टा करतोय)”, असं उत्तर दिलं होतं. आता असाच एक प्रश्न आनंद महिंद्रा यांना विचारला आहे. त्याला आनंद महिंद्रा यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.

शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना तुमचा आवडता विषय कोणता होता?, असा प्रश्न एका युजर्सने त्यांना विचारला आहे. त्यावर आनंद महिंद्रा यांनी उत्तर दिलं आहे. “इतिहास. जे लोक भूतकाळात जगणे आवडत नाही असा प्रतिवाद करतील त्यांच्यासाठी, मी सांगेन की, भूतकाळातून धडा शिकल्याशिवाय तुम्ही भविष्याचा शोध लावू शकत नाही”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आनंद महिंद्रा यांनी प्रश्नाला उत्तर देताच ट्विटरवर त्याच्या पोस्टखाली कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरु झाला आहे. तर अनेक जण त्यांनी दिलेलं उत्तर रिट्वीट करत आहेत.