नागालॅंडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. त्यांच्या खास शैलीतील भाषणासाठी, एक्स (ट्विट) साठी ते प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फॉलोअर्सदेखील चांगल्या प्रमाणात आहेत. त्यामुळे ते अनेकदा त्यांच्या मजेदार पोस्टमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतात. तर आज त्यांनी प्रवासादरम्यान इंडिगो विमानातील खास गोष्ट फोटो काढून शेअर केली आहे आणि सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
ही व्हायरल पोस्ट विमानातील आहे. नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग इंडिगो कंपनीच्या विमानातून दिमापूर ते दिल्ली असा प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांचं खास स्वागत करण्यात आलं. त्यांना काही खाण्याचे सामान, तसेच त्यांच्यासाठी एक मजेशीर चिठ्ठी लिहून ठेवण्यात आली होती. इंडिगो विमान कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्यानं अलॉन्ग यांची प्रशंसा करीत एक चिठ्ठी लिहिली. या महिला कर्मचाऱ्यानं चिठ्ठीत नक्की काय लिहिलं एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमध्ये बघा.
हेही वाचा…VIDEO: गाडी बंद पडली अन् तरुणाने रॅपिडो बाईक केली बुक; पुढे जे घडलं… ते पाहून चालकाचं कराल कौतुक
पोस्ट नक्की बघा :
नागालँडचे मंत्री अलॉन्ग यांनी या चिट्ठीचा फोटो काढून शेअर केला आहे. पोस्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, कॅडबरी, पेय आणि एक चिठ्ठी ठेवली होती. तसेच या चिठ्ठीत असे लिहिले आहे की, “प्रिय अलॉन्ग, तुम्ही प्रवास करण्यासाठी इंडिगो विमानाची निवड केल्याबद्दल धन्यवाद. आज तुमची सेवा करताना आम्हाला आनंद होत आहे, धन्यवाद”; अशी खास चिठ्ठी इंडिगो विमानात काम करणाऱ्या त्या महिला कर्मचाऱ्यानं लिहून ठेवली होती.
नागालँडचे मंत्री अलॉन्ग यांनी इंडिगो विमानात काम करणाऱ्या त्या महिला कर्मचारी यांच्याबरोबर फोटो आणि त्यांनी लिहिलेली चिट्ठी याचा फोटो शेअर करीत लिहिले की, “हे पाहून तुमच्याही मनात लाडू फुटले का? हो, माझ्याही आणि यावेळी ४०० पार झाले”; अशी मजेशीर कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट नागालॅंडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग यांच्या @AlongImna या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे, जी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.