प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमीच विविध प्रकारचे व्हिडीओ इंटरनेटवर शेअर करतात. महिंद्रा यांनी ट्विटरवर काहीही शेअर केलं की ते ट्विट लगेच व्हायरल होतं. या व्हिडीओंच्या माध्यमातून ते देशभरातील तरुणांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करतात. यावेळी देखील उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यातून महिंद्रा यांनी दिलेला संदेश तुम्हाला प्रेरणा देईल यात शंकाच नाही!
आनंद महिंद्रांचा सल्ला
नुकताच उद्योजक आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नदीच्या काठी एक सुंदर हरीण भर उन्हात पाणी पित आहे. आजुबाजूलाही सर्वत्र शांतता आहे, मात्र अचानक पाण्यातून महाकाय मगर हरणावर हल्ला करण्यासाठी पाण्यातून बाहेर हरणाच्या दिशेने उडी घेते. हरीण किती चपळ असते, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मगरीच्या हल्ल्यातून हरीण संपूर्ण ताकदीसह मागे झेप घेतं आणि बाचवतो. हरणाचा हाच चपळपणा आनंद महिंद्रांना भावला असून हरणाप्रमाणे चपळ आणि आजूबाजूला नेहमी तिक्ष्ण नजर असली पाहिजे असा सल्ला ते देत आहेत.




पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: प्रेयसीला मिठी मारत मेट्रोखाली मारली उडी, कोलकता येथे लव्हस्टोरीचा दुख:द ‘द एन्ड’…
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेली ही पोस्ट थोड्या कालावधीतच व्हायरल झाली. या पोस्टवर अनेक कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. दरम्यान, अशा नवनवीन गोष्टीचं लोकांना नेहमीच कुतुहल वाटत असतं. त्यामुळे सोशल मीडीयावर नेटकरी अशा व्हिडीओंना भरपूर पसंती देतात.