Anand Mahindra Latest Tweet: भारतातील शहरांमध्ये ट्रॅफिक जाम होणे ही एक मोठी समस्या आहे. तासनतास वाहतूक कोंडीत अडकल्याने नागरिक त्रस्त होतात. रस्त्यांचे रुंदीकरण होऊनही ट्रॅफिक जाम होण्याची समस्या काही संपत नाही. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ट्रॅफिक वाढते. यातच महिंद्रा कंपनीचे सीईओ आणि प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी आपल्या नवीन ट्वीटमध्ये रोड डिझाइनचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ट्रॅफिक सिग्नलशिवाय वाहने धावत आहेत. पण भारतात हे शक्य होऊ शकते का, यावर युजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

आनंद महिंद्रा यांचे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ २३ फेब्रुवारीला शेअर केला होता. ४७ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये ट्रॅफिक सिग्नल नसतानाही ट्रॅफिक कसे व्यवस्थापित केले जाऊ शकते हे दाखवले आहे. २०१६ मध्ये यमनचे अभियंता मुहम्मद अवास यांनी या रस्त्याचे डिझाईन तयार केल्याचे सांगितले जाते.

व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले, ‘आकर्षक. यमनमधील अभियंता मुहम्मद आवस यांनी डिझाइन केलेले (२०१६ मध्ये विकसित केलेले) ‘हाफ इंटरसेक्शन’ वापरून हे मॉडेल ट्रॅफिक लाइटशिवाय सतत रहदारी नियंत्रित करते. पण त्यात जास्त इंधनाचा वापर होतो का? या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वाहने न थांबता रस्त्यावरून जात आहेत.

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: Video: तरुणीचा जीवाशी खेळ! ट्रेनच्या खिडकीतून डोकं बाहेर काढलं अन्…)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आनंद महिंद्राच्या या व्हिडिओवर अनेक इंटरनेट युजर्सनी आपले मत मांडले आहे. काही लोक या रोड मॉडेलने प्रभावित झाले, तर अनेकांनी शंका उपस्थित केली आणि सांगितले की हे भारतात चालणार नाही. एका ट्विटर वापरकर्त्याने सांगितले की, हे मॉडेल चांगले नाही कारण ते जास्त इंधन वापरते. तसेच वेळ जास्त लागतो. तथापि, दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की जर एखाद्याला सिग्नलवर थांबावे लागत नसेल आणि ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो नाही, तर इंधनाच्या वापरामध्ये कोणतीही समस्या नसावी.