सोशल मीडियावर आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन गेम्स पाहिले असतील. पण, आता व्हायरल होणाऱ्या ऑप्टिकल इल्युजनमध्ये खेळातील पत्त्यांचा वापर करण्यात आला आहे; ज्यातील प्रश्न सोडवताना आता अनेकांना खूप डोकं वापरावं लागत आहे. पत्त्यांमधील चौकटच्या ‘८’ नंबरच्या कार्डवरील तिसरा ८ अंक तुम्हाला शोधून दाखवायला आहे; जो शोधण्यात भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रादेखील अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या फोटोतील ८ अंक तुम्हाला दिसतोय का हे आम्हाला सांगा …

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी चौकटच्या ८ नंबरच्या पत्त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात दोन ८ अंक डोळ्यांना नीट दिसत आहेत; पण तिसरा ८ अंक शोधण्यात अनेकांना अपयश येत आहे. खुद्द आनंद महिंद्रा यांनाही तो शोधता आला नाही. त्यामुळे त्यांनी युजर्सना हा अंक दिसतोय का, असा सवाल केला आहे.

@Rainmaker1973 नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा फोटो पोस्ट केला गेला आहे; जो आता आनंद महिंद्रा यांनी रिट्विट केला आहे. त्यात तुम्हाला खेळातल्या पत्त्यांमधील ८ नंबरचा चौकटचा पत्ता दिसत आहे. या पत्त्यावर तुम्हाला दोन ८ अंक अगदी सहज दिसत आहेत. पण, या पत्त्यावर आणखी एक म्हणजे तिसरा ८ अंक लपलेला आहे; जो तुम्हाला शोधायचा आहे. चौकटच्या या पत्त्याचा फोटो शेअर करून युजर्सना एक प्रश्न विचारला गेलाय की, ८ नंबरच्या पत्त्याच्या मध्यभागी असलेला तिसरा ८ अंक किती लोकांना सापडला? ऑप्टिकल इल्युजनमधील या पत्त्यांच्या खेळातील ८ नंबरच्या पानावरील ८ अंक शोधणं अनेकांना जमलंच नाही. असं असलं तरी ११ ऑगस्ट रोजी शेअर केलेल्या या फोटोमध्ये लोकांनी खूप इंटरेस्ट घेतला आहे. त्यामुळे फोटोला एक मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. त्याच वेळी सुमारे नऊ हजार लोकांनी त्याला लाइक केले आहे. याशिवाय युजर्स विविध प्रकारे कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलेय की, आताच नोटीस केले. तर दुसऱ्या एकाने लिहिलेय की, आता समजले. एकंदरीत व्हायरल फोटो पाहिल्यानंतर लोकांना हा पॅटर्न समजला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल फोटो-

चौकटचा हा पत्ता जवळून पाहिल्यास, तुम्हाला तिसरा ८ अंक लगेच दिसून येईल. त्यासाठी तुम्हाला फक्त नजर अगदी मधोमध ठेवावी लागेल. काही काळ लक्ष केंद्रित केल्यानंतर तुम्हाला हे इतके चॅलेंजिंग का होते हे समजेल. परंतु, जर तुम्हालाही अद्याप तिसरा ८ अंक दिसला नसेल, तर त्यासाठी वरील फोटो अगदी टक लावून पाहा.