scorecardresearch

Viral: कलेशी चिकटून राहिलेल्या २० वर्षीय कलाकाराचं आनंद महिंद्रांनी केलं कौतुक, म्हणाले “दबावाला न जुमानता…”

चेन्नईच्या रेखाचित्रे रेखाटनाऱ्या २० वर्षांच्या तरुणाची हृदयस्पर्शी कथा आनंद महिंद्रांनी शेअर केली आहे.

Anand Mahindra 20 year old artist
चेन्नईच्या २० वर्षांच्या तरुणाची कहाणी (Express Photo )

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी अलीकडेच एका लहान मुलाचा वेगळ्या पद्धतीने मासेमारी करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. दृढनिश्चय, साधेपणा, संयम हाच यशाचा फॉर्म्युला आहे हे तेव्हा त्यांनी व्हिडीओतून दाखवून दिल होत. आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा हा फॉर्म्युला शेअर केला आहे पण यावेळी कथा आहे एम सुरेंद्र या २० वर्षांच्या तरुणाची.

एम सुरेंद्र हे चेन्नईच्या विरुगंबक्कम येथील अवची कला आणि विज्ञान महाविद्यालयात व्हिज्युअल कम्युनिकेशनचे अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. तो चेन्नईच्या पाँडी बाजारमधील लोकांची रेखाचित्रे बनवतो. तो एका गरीब कुटुंबातील आहे आणि गरिबीमुळे त्याला शिक्षण सोडावे लागू नये म्हणून आणखी काही पैसे मिळवण्यासाठी तो रोज संध्याकाळी पाँडी बाजारात स्केच बनवतो.

(हे ही वाचा: हजारो फूट उंचीवर बंद पडले हेलिकॉप्टर, इंजिन सुरू करण्यासाठी पायलटने हवेतच बाहेर येऊन…;बघा Viral Video)

आनंद महिंद्रांची खास पोस्ट

महिंद्रा आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एम सुरेंद्रबद्दल लिहिले, ‘निश्चय + साधेपणा + संयम = यशाच्या सूत्राचे अनुसरण करणारा आणखी एक धाडसी माणूस. अधिक किफायतशीर व्यवसायात प्रवेश करण्याच्या दबावाला न जुमानता कलेशी चिकटून राहण्याचे मला कौतुक वाटते. मी त्याला एक फोटो पाठवण्याचा आणि त्याच्याकडून एक पोर्ट्रेट काढून घेण्याची एक योजना आखत आहे!’

(हे ही वाचा: Viral: जास्त खाल्ल्यानंतर मांजरीची झाली ‘अशी’ अवस्था, Video बघून तुम्हाला हसू आवरणार नाही)

वडील करतात रोजंदारी कामगार

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, एम सुरेंद्रने आतापर्यंत WWE रेसलर ‘द रॉक’पासून सुपरस्टार रजनीकांतपर्यंत अनेकांचे स्केच काढले आहेत. त्याचे पालक वेगळे झाले आहेत. तो वडील आणि लहान भावासोबत राहतो. त्याचे वडील रोजंदारी मजूर आहेत. एम सुरेंद्र अभ्यासात खूप हुशार आहे. त्याला दहावीत ५०० पैकी ४९२ गुण मिळाले होते. त्याच वेळी, बारावीमध्ये त्याला ६०० पैकी ५२३ गुण मिळाले होते.

(हे ही वाचा:Viral: मासे पकडण्यासाठी मुलाने केला अप्रतिम जुगाड; आनंद्र महिंद्रांनी शेअर केला Video)

(Indian Express Photo)

(हे ही वाचा: शिकारीसाठी विषारी साप घुसला घरट्यात, पक्ष्यांच्या जोडीनेही दिलं चोख प्रत्युत्तर; बघा Viral Video)

तो लहानपणापासून चित्रकला करत असून अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक बक्षिसे मिळवली आहेत. त्याला अनेक कंपन्यांकडून ऑफरही आल्या पण त्याला आधी आपले शिक्षण पूर्ण करायचे आहे. जरी तो शॉर्ट फिल्म्स, टायटल डिझाईन इत्यादींसाठी फ्रीलान्सिंग करतो. स्केचेस बनवून त्यांना मिळणारे उत्पन्न त्यांना त्यांचे शैक्षणिक शुल्क आणि वैयक्तिक खर्च भरण्यास मदत करते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anand mahindra shared post of chennais 20 year old artist ttg

ताज्या बातम्या