महिंद्रा अँड महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असतात. ते सतत नवनवीन ट्रेंड, देशी जुगाड यासारख्या व्हायरल व्हिडीओंची दखल घेत असतात. यासाठी ते आपल्या ट्विटर अकाऊंटचा वापर करतात. शिवाय त्यांनी पोस्ट केलेले व्हिडीओ नेहमीच अनेकांचे लक्ष वेधून घेतात. नुकताच त्यांनी फायर सेफ्टी डिव्हाईसचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये इमारतीला आग लागल्यानंतर उपयोगी येणारे एक सेफ्टी डिव्हाईस दाखवलं आहे. उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा खूप महत्वाचा व्हिडीओ आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा सतत नवनवीन आणि तंत्रज्ञानाशी संबंधित व्हिडीओ शेअर करत असतात. शिवाय ज्यातून लोकांना काही मदत होईल, काही मेसेज देता येईल असे व्हिडीओ ते शेअर करतात. सध्या त्यांनी एका सेफ्टी डिव्हाईसचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये उंच इमारतीला आग लागल्यानंतर लोकांना बाहेर उडी मारण्यासाठी एक हवेत उडणारं जॅकेट टाईप डिव्हाईस दिसत आहे.

हेही पाहा- Video: पापा की परीचा अजून एक कारनामा! बाईकवरून सुसाट जाताना अचानक एकाला दिली धडक अन्…

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मला आशा आहे की तो खरा असेल आणि एखादी कंपनी तो बनवत असेल. मी जर उंच इमारतीत राहिलो तर, तो प्राधान्याने खरेदी करेन! खूप नाविन्यपूर्ण.” ४० सेकंदांच्या या अॅनिमेटेड व्हिडिओमध्ये एक माणूस एक व्यक्ती इमारतीला आग लागल्याचे पाहताच सेफ्टी डिव्हाईस परिधान करतो बेल्ट लावतो आणि उंच इमारतीवरून खाली उडी मारतो. शिवाय हे सेफ्टी डिव्हाईस खाली पडताना फुग्याप्रमाणे फुलते ज्यामुळे त्यामधील व्यक्ती सुरक्षित राहिल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

हेही पाहा- बापरे! एकाच वेळी दोन्ही हातांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिते ही मुलगी; व्हायरल video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

आतापर्यंत हा व्हिडीओ ४.७ मिलियनहून अधिक लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला ७० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तर या व्हिडीओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले की, ‘माणसाचं मन जे काही विचार करू शकते, ते साध्य करू शकते.’ दुसर्‍याने लिहिले, ‘उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी गरजेची वस्तू आहे, परंतु त्यावर अजून खूप काम करण्याची गरज आहे. तर आणखी एकाने ‘जसे आहे तसे’ चालणार नाही. यामध्ये अनेक बदल आवश्यक आहेत असं म्हटलं आहे