कर्नाटकातील एका १७ वर्षांच्या मुलीच्या अनोख्या टॅलेंटने इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या मुलीचे टॅलेंट पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. तर या मुलीकडे एवढं काय विषेश टॅलेंट आहे ? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर जाणून घेऊया या मुलीकडे असं काय कौशल्य आहे ज्याची भुरळ नेटकऱ्यांना पडली आहे.

तुम्ही कधी दोन्ही हातांनी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या भाषा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे का? नसेल तर मग हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ नक्की बघा. जो बघितल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील मुलगी तिच्या दोन्ही हातांनी एकाच वेळी, समान वेगाने काहीही लिहू शकते. इतकंच नव्हे तर ती एका भाषेत काही लिहित असताना दुसऱ्या हाताने वेगळ्या भाषेतील मजकूरही आरामात लिहू शकते.

हेही पाहा- मुलीने चक्क केकपासून बनवला ड्रेस; गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या केक ड्रेसचा Video एकदा पाहाच

सोशल मीडियावर व्हायरल होत असणारी ही मुलगी कर्नाटकातील मंगळुरू येथील रहिवासी असून तिचे नाव आदि स्वरूपा असं आहे. तिने आपल्या अनोख्या टॅलेंटमुळे पालकांचे, शहराचे आणि देशाचेही नाव उंचावले आहे. कारण तिच्या नावावर आता जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. १७ वर्षीय आदि स्वरूपा एकाच वेळी इंग्रजी आणि कन्नड या दोन्ही भाषेत लिहू शकते. शिवाय ती एका मिनिटात ४५ शब्द वेगवेगळ्या दिशेने लिहू शकते याबद्दल लता फाऊंडेशनने तिच्या या अनोख्या कौशल्याची नोंद घेतली आहे.

हेही पाहा – रस्ता क्रॉस करताना नील गाय थेट कारच्या काचेमधून आत शिरल्याचा धक्कादायक Video Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या या आदि स्वरुपाचा दोन्ही हातांनी वेगवेगळ्या शैलीत लिहित असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत असून तिच्या या कलेचे अनेकांनी कौतुक केले आहे. या मुलीच्या अनोख्या पद्धतीने लिखाण करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. तर @ravikarkara नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “ही मंगलोरमधील ‘आदी स्वरूपा’ आहे. जी ११ वेगवेगळ्या शैलीमध्ये लिहू शकते. तिच्या मेंदूचे दोन्ही भाग एकाच वेळी काम करतात, जे लाखातील एक आश्चर्य आहे. तर तिच्या या कौशल्याला अ‍ॅम्बिडेक्सटेरिटी म्हणून ओळखले जाते.”