देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे अनेकदा आपल्या ट्वीटमुळे चर्चेत असतात. ते दररोज असे काही व्हिडिओ आणि ट्वीट शेअर करत असतात जे अनोखे वाटतात. हे व्हिडीओ आपल्याला कधीकधी हसवतात तर काही शेअर केलेले ट्वीट आपल्याला जीवनाचा चांगला धडा शिकवतात. असेच एक ट्वीट सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे. जे पाहिल्यानंतर तुमचा दिवस नक्की आनंदात जाईल.

२०२२ चा FIFA विश्वचषक लवकरच सुरू होणार आहे आणि कतारमध्ये होणार्‍या मेगा स्पर्धेची जगभरात उत्सुकता सुरू आहे. हा उत्साह केवळ या फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांपुरता मर्यादित नसतो, तर जगभरातून लोक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी येतात. या स्पर्धेसाठी लोकं कोट्यवधी रुपये रुपये केवळ प्रमोशनमध्ये खर्च करतात. पण या महागड्या जाहिराती लोकांमध्ये तितका उत्साह निर्माण करू शकणार नाहीत, जितका आफ्रिकेतील काही मुलांनी विश्वचषकापूर्वी एकत्र केला आहे.

( हे ही वाचा: दंगल गर्ल गीता फोगटने खरेदी केली महिंद्रा स्कॉर्पिओ-एन कार; आनंद महिंद्रा म्हणाले, “आमच्यासाठी तर हा…”)

आनंद महिंद्रा यांचे ट्विट येथे पाहा

( हे ही वाचा: Video: गावातील माणसाने ट्रकला बनवला चालता फिरता लग्नमंडप हॉल; आनंद महिंद्रा म्हणाले ‘मला भेटायचे आहे…’)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, आफ्रिकेतील काही मुले फिफा वर्ल्ड कपसारखे वातावरण तयार करून मॅच खेळताना दिसत आहेत. यामध्ये FIFA 2022 चा बॅनर दिसतो आहे. जो त्यांनी स्वतः बनवला आहे आणि त्यानंतर दोन्ही संघ मैदानात फुटबॉल घेऊन भांडू लागतात, परंतु काही वेळाने मुले खेळ सोडून नाचू लागतात. त्याचा हा डान्स खूपच अनोखा असतो आणि बघता बघता तो विजयानंतरच्या सेलिब्रेशनचा आनंद घेत असल्याचे दिसते.