Viral video: शहरे असोत वा रेल्वे स्टेशन्स, स्वच्छतेच्या बाबतीत लोक कितीही सांगितलं तरी एकत नाहीत. ‘मी कचरा करणार नाही आणि दुसऱ्याला करु देणार नाही’ हा संकल्प आपण स्वतः अंमलात आणत नाही, तोपर्यंत आपल्याला प्रशासनाला दोष देण्याचा अधिकार नाही, असं स्पष्ट मत बहुतांश प्रतिक्रियांमधून व्यक्त झालं. स्वच्छतेच्या दुश्मनांवर कडक दंडात्मक कारवाई हाच रामबाण इलाज असल्याचंही अनेकांना वाटतंय. असाच एक गेट ऑफ इंडियाजवळचा व्हायरल व्हिडीओ पाहून “हे पाहून त्रास होतो,” म्हणत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप व्यक्त कराल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लोकांचा एक गट मोठ्या पिशव्यांमधून फुले समुद्रात टाकताना दिसत आहे. गेटवे ऑफ इंडियाजवळ हे दृश्य रेकॉर्ड करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “मुंबईचे चांगले नागरिक. गेटवे ऑफ इंडिया येथे पहाटे.”

मुंबईतील लोक समुद्रात फुले टाकताना दिसत असलेल्या या व्हिडिओला प्रतिसाद देत आनंद महिंद्रा यांनी पोलिसांना आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनाही त्यांच्या पोस्टमध्ये टॅग केले.आनंद महिंद्रा यांच्या पोस्टच्या कॅप्शनवरून स्पष्ट होते की, “नागरिकांनी दृष्टिकोन बदलला नाही तर भौतिक पायाभूत सुविधांमध्ये कितीही सुधारणा केल्या तरी ते कमीच आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> इथले लोक आवडीने खातात डासांपासून बनलेला ‘मॉस्किटो बर्गर’; VIDEO पाहून व्हाल चकित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आनंद महिंद्राची पोस्ट व्हायरल होताच, अनेकांनी उद्योगपतींच्या विचारांचा पुनरुच्चार केला. “निश्चितपणे, शहराचा आत्मा केवळ त्याच्या रचनेत नसून तेथील लोकांच्या मानसिकतेत असतो. लोकांची वृत्ती, जबाबदारीमध्ये बदल झाला तर शहराच्या जीवनाचा दर्जा खरोखरच उंचावू शकतो. त्यामुळे सकारात्मक बदलाची आशा आहे,” अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.