Viral video: अनंद चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक आणि हजारो घरगुती गणपती बाप्पांना या दिवशी निरोप दिला. गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या गणपतीचे विसर्जन करताना घरातील वातावरण अगदी भावपूर्ण झालेले असते. गणपती बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला जातो. अशातच विसर्जनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लोकांना काही वेगळे दिसले तर लोकं त्याचा लगेच व्हिडीओ बनवतात आणि सोशल मीडीयावर अपलोड करतात. नवे व्हिडिओ लोकांना खूप आश्चर्यचकित करतात.

अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. श्रद्धेच्या बळावर जग जिंकता येऊ शकेल, असे म्हटले जाते. गणपती दूध पितो, नंदी पाणी पितो अशा घटना अधूनमधून कुठे ना कुठे घडतच असतात. दरम्यान सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये विसर्जित केलेली बाप्पाची मूर्ती चक्क उठून उभी राहताना दिसत आहे. होय, विश्वास बसत नसेल तर हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ तुम्ही एकदा पाहाच.

पाण्यात सोडलेली मूर्ती पुन्हा मागे फिरली

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नदीत पाण्याच्या प्रवाहात गणपती बाप्पाचा चमत्कार पाहायला मिळाला आहे. गणपती विसर्जनाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भाविक आपल्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी नदीवर आले आहेत. यात एक व्यक्ती आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी नदीच्या पाण्यात उभा आहे. मात्र वाहत्या पाण्यात मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर जणू एक चमत्कार झाला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून न जाता तिथेच थांबत आहे. यावर भक्ती अशी करावी की गणपतीलाही भाविकांसोबत थांबावे वाटेल असं नेटकरी म्हणत आहेत.

पाहा व्हिडीओ

श्रद्धेच्या जगात भक्तिभावसोबतच अंधश्रद्धा देखील मोठ्या आहेत. दरवर्षी कुठे ना कुठे काही ना काही चर्चा होतच असते. कधी गणपती दूध पितो तर कधी नंदी पाणी पितो, कुठे दगड गोल फिरतो तर कुठे मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू, कुंकू बाहेर पडते असे प्रकार समोर येत असतात. प्रत्येकवेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या प्रकारांचे खंडन केले जाते आणि त्याला विज्ञानाची जोड देण्यात येत असते. नेटकरीही यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.