Andhra Pradesh Couple Video:आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये बाईकवर रोमान्स करत असलेल्या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुण दुचाकी चालवत आहे आणि तरुणी चालत्या मोटारसायकलच्या टाकीवर त्याला मिठी मारून बसली आहे. दोघांच्या या रोमान्सचा व्हिडिओ कुणीतरी बनवला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ विशाखापट्टणममधील स्टील प्लांट रोडचा आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवणे प्रकरणी कायदा कलम 336, 279, 132 आणि 129 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: Video: दारुड्याने फ्लाइंग किस करत चक्क चालत्या ट्रेनला थांबवलं; लोको पायलटने खाली उतरत त्याला पकडलं अन..)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाटयाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत आहेत. या व्हिडिओवर काही जणांच्या संतप्त प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.