Video Lion and Monkey Fight: असं म्हणतात की एखादा माणूस कितीही दुबळा का असे ना पण जेव्हा त्याच्या कुटुंबावर किंवा त्याच्या घरावर कोणाची वाकडी नजर पडते तेव्हा त्यात दहा हत्तीचं बळ येत असतं. आजवर आपण उत्क्रांतीचे जे धडे घेतले त्यावरून माणूस हे माकडांचे विकसित रूप आहे असे म्हटले जाते. त्यामुळे माणसाच्या या काही सवयी व गुणधर्म माकडांमध्ये सुद्धा असणार हे निश्चित. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका सिंहाने माकडाच्या कुटुंबावर हल्ला केल्याचे दिसतेय पण हे लक्षात येताच सिंहाच्या अर्ध्या आकाराच्या माकडाने जो काही पराक्रम दाखवला आहे तो बघून भलेभले थक्क होतील.

तुम्ही व्हायरल व्हिडिओमध्ये बघू शकता. एक सिंह गवताळ मैदानात बसलेल्या एका माकडाच्या कुटुंबावर हल्ला करतो. यावेळी माकडं जोरजोरात किंचाळू ओरडू लागतात. हा आवाज ऐकताच थोड्या अंतरावरून एक माकड (वानर/ बबून) धावत येतं आणि सिंहावरच हल्ला उलटवून देतं. आता सिंह पण जंगलाचा राजा आहे म्हटल्यावर असा चटकन हातातील शिकार सोडून देणार नाहीच. पण तरीही सिंहासमोर ते माकड कडवी झुंज देतं. विश्वासही बसणार नाही अशा वेगाने माकड सिंहावर हल्ला करून त्याला पळवून लावतं.

Video : सिंहाचा कुटुंबावर हल्ला होताच माकडात आली शक्ती

हे ही वाचा<< रक्षाबंधनाला खान सरांचा वर्ल्ड रेकॉर्डवर दावा; कोचिंग सेंटरमध्ये जमल्या ७००० बहिणी, पुढे अडीच तासात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या व्हिडिओवर कमेंट करून काहींनी या माकडाच्या प्रजातीविषयी सुद्धा माहिती दिली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंत ते माकड बबुन या नावाने ओळखलं जातं. ही माकडांची सर्वात आक्रमक व मोठ्या आकाराची प्रजाती मानली जाते. ही माकडं साधारणतः फळं आणि पालापाचोळा खातात. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे का सिंहाने माकडाच्या टोळीवर भररस्त्यात हल्ला केल्याचा व्हिडीओ सुद्धा खूप व्हायरल झाला होता. यावेळी टोळीने एकत्रितपणे सिंहावर पलटवार केला होता पण आता व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एकट्या माकडाने सिंहाला पळवून लावले आहे.