Leopard hunted down a buffalo calf Video Viral: जंगलात प्रत्येक वन्यप्राण्याला जगण्यासाठी प्रत्येक क्षणी मोठा संघर्ष करावा लागतो. थोडीशी बेफिकिरीही त्याच्या जीवावर बेतते. सिंह, वाघ व बिबट्या हे जंगलातील सर्वांत धोकादायक प्राणी मानले जातात. कोणतीही शिकार दिसली की, ती ते झटक्यात तिचा वेध घेतात. यापैकी बिबट्या अधिक धोकादायक आहे. त्याच्या सामर्थ्याशी स्पर्धा करणं क्वचितच कोणाला शक्य आहे. बिबट्या हा अत्यंत चतुर व चलाख शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. जंगलातील सर्वांत निर्दयी शिकारी प्राणी कोण, असा विचार करीत असाल, तर तो बिबट्या आहे, जो आपल्या शिकारीचा अतिशय निर्दयीपणे जीव घेतो. असं म्हणतात की, तो अगदी गर्द झाडीमध्ये किंवा गडद अंधारातही शिकार करू शकतो. तो इतका धाडसी शिकारी आहे की, काही वेळेस तो लोकांच्या घरात शिरूनही प्राण्यांना उचलून नेण्यासही कचरत नाही. सध्या या प्राण्याशी संबंधित एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो एका निष्पाप म्हशीच्या रेडकूला आपली शिकार बनविताना दिसत आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे बिबट्याने ही शिकार करण्यासाठी फक्त आपल्या चपळतेचा वापर केला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, एक म्हैस आणि तिचे रेडकू जंगलात आनंदाने गवत चरत आहेत. त्यांना या धोक्याची अजिबात जाणीव नाही की, एक बिबट्या म्हशीच्या त्या बाळावर बारीक नजर ठेवून, त्याची शिकार करण्याच्या संधीची वाट पाहत आहे. मग त्याप्रमाणे संधी मिळताच बिबट्या लगेच म्हशीच्या रेडकावर हल्ला करतो आणि क्रूरपणे त्याचा जीव घेतो. येथे आई आपल्या बाळाला बिबट्यापासून वाचविण्यासाठी सर्व काही शर्थीचे प्रयत्न करते; परंतु शेवटपर्यंत तिला आपल्या बाळाला वाचविण्यात यश मिळत नाही.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, येथे बिबट्या सावज हेरून, ते टप्प्यात येण्याच्या संधीची वाट पाहत असतो. जेव्हा ते रेडकू त्याच्या आईपासून दूर जाते, तेव्हा बिबट्या नेमकी तीच संधी साधून लगेच त्या म्हशीच्या रेडकावर झेप घेतो आणि त्याची शिकार करू लागतो. यादरम्यान, त्याची आई समोर येते तेव्हा तो त्या बाळाला घेऊन झुडपात जातो आणि तिथे त्या बाळाचा जीव घेतो आणि त्या मातेच्या हाती बाळ गमावतानाचे दृश्य ओल्या डोळ्यांनी हतबल होऊन पाहण्याशिवाय काहीच राहिलेले नसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @lesitha_prabath नावाच्या अकाउंटद्वारे शेअर केला गेला आहे. बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत हजारो लोकांनी तो पाहिला आहे आणि कमेंट करून आपापल्या प्रतिक्रिया ते देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, “हा व्हिडीओ खूप वेदनादायक आहे.” अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.