Bull Attack Man Video Viral : पिसाळलेल्या बैलांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, जे अनेकदा भयानक अन् धडकी भरवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून आपल्या काळजाचा ठोका तर चुकणार नाही ना, असा आभास निर्माण होतो. कारण- या व्हिडीओत एक पिसाळलेला बैल भररस्त्यात एका मद्यपी तरुणावर जीवघेणा हल्ला करतो. त्या बैलाच्या हल्ल्यामुळे ती व्यक्ती ज्या प्रकारे हवेत उडून कोसळते, ते पाहताना तुम्हालाही भीती वाटल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक भटका बैल रस्त्यावर आरामात फिरत होता. याच वेळी दारूच्या नशेत एक तरुण त्याच्या अगदी समोरून जात होता. तेथून जवळपास अनेक वाहने आणि लोकांची वर्दळही सुरू आहे. पण, त्या प्रसंगी अचानक बैल त्या तरुणावर जीवघेणा हल्ला करतो.
बैल तरुणाला अक्षरश: शिंगांनी हवेत उडवतो अन् …
बैल तरुणाला अक्षरश: शिंगांनी हवेत उडवतो आणि थेट जवळच्या नाल्यात फेकून देतो. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, तो तरुण तोंड नाल्यात आणि पाय बाहेर, अशा स्थितीत नाल्यात कोसळतो, ज्यामुळे त्याला उठणंही कठीण झालं होतं. पण, दुसऱ्याच क्षणी त्यानं सर्वांनाच आश्चर्यचकित केलं.
कारण- बैलाच्या भयंकर हल्ल्यानंतरही तो तरुण अशा रीतीनं उभा राहिला की, जणू काही त्याला काहीच झालं नाही. इतक्या भयंकर हल्ल्यानंतरही हा तरुण सहजगत्या कसा काय उभा राहिला हे पाहून लोकांनाही आश्चर्य वाटलं.
बैलाच्या हल्ल्याचा हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर आता अनेक युजर्स कमेंट करीत आहेत. एका युजरनं कमेंट केली की, ही देसीची पावर. दुसऱ्या युजरने कमेंट केली की, आत दारू आहे; पण बाहेर भीती आहे. तिसऱ्या युजरने म्हटले की, बायको असो वा बैल… एक पुरुष सर्व काही सहन करतो.