Viral Video : सोशल मीडियावर स्थानिक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी प्रवाशांची भांडणं तर कधी कंडक्टर बरोबरचा वाद समोर येतो तर कधी बसमध्ये बनवलेले रिल तर कधी लालपरीवर असलेले प्रेम यावर सुद्धा अनेक व्हिडिओ चर्चेत येतात. तुम्ही सोशल मीडियावर एमएसआरटीसीच्या बसचे अनेक व्हिडीओवर पाहिले असतील सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक आजोबा चक्क सीट पकडण्यासाठी बसच्या बाहेरून खिडकीवर चढताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
सीट पकडण्यासाठी आप्पा थेट खिडकीवर चढले
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये भयंकर गर्दी असते कारण जास्तीत जास्त प्रवासही हे बसने प्रवास करतात. अनेकदा बसमध्ये प्रवास करताना सीट मिळत नाही. अशावेळी सीट पकडण्यासाठी लोक वाट्टेल ते प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्धा आजोबा सीट पकडण्यासाठी चक्क बसच्या बाहेरून खिडकीवर चढताना दिसतात. त्यांना पाहून सर्व लोक थक्क होतात कंडक्टर इतर प्रवासी या आजोबांना थांबवण्याचा प्रयत्न करतात पण आजोबा कुणाचेच ऐकत नाही आणि चक्क खिडकीतून बसमध्ये प्रवेश करतात. व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडीओवर लिहिलेय, “हे शेवटचे आप्पा आहेत.” या व्हिडीओवर लोकप्रिय ‘आप्पाचं विषय हार्ड हे’ हे गाणं ऐकू येत आहे.
हेही वाचा : “बाप्पाचीच कृपा” अपंग तरुण एका पायावर उभं राहून घडवतोय मूर्ती, VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : भयंकर! आधी प्रेमाने जवळ आला, व्यक्तीने हात लावताच थेट लचका तोडला; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कोणाची?
marathi_epic_jokes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मग सगळे लेकरं असं करतात मग म्हातारी का मागे राहतील” तर एका युजरने लिहिलेय, “अप्पा कडे फुकटच एस्टी च कार्ड ये” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरा अप्पा भेटला शेवटी” एक युजर लिहितो, “हो खरंच, विषय…गंमतीचा असला तरी…खरच हे आपल्या शेवटचे पिढी ची आप्पा आहेत अशी पिढी पुन्हा होणे शक्य नाही..ह्या गोष्टीला नाकारता येणार नाही..” तर एक युजर लिहितो, “तरुण मुलांना लाजवेल असे फिट आहे.”