अ‍ॅपल ‘शॉट ऑन आयफोन’ मॅक्रो फोटोग्राफी चॅलेंजच्या दहा जागतिक विजेत्यांमध्ये कोल्हापूरच्या प्रज्वल चौगुले याचा समावेश आहे. चीन, हंगेरी, इटली, स्पेन, थायलंड आणि अमेरिका या देशांतील इतर नऊ विजेत्यांमध्ये प्रज्वल चौगुलेच्या नावाचाही समावेश झाला आहे. दहा फोटोंची चर्चा सर्वत्र असून फोटोंचं प्रदर्शन Apple.com वर, Apple च्या Instagram (@apple) वर करण्यात आलं. कोळ्याच्या जाळ्यावर पडलेल्या दवबिंदूने प्रज्वलचं लक्ष वेधलं. क्षणाचाही विलंब न करता प्रज्वलने आपल्या आयफोन १३ प्रोमध्ये छायाचित्र बंदिस्त केलं. जाळ्यावर दवबिंदू मोत्यासारखे चमकत होते. या छायाचित्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. निसर्गाचं एक रुप छायाचित्राच्या कॅनव्हासवर दिसून आलं.

“मी एक निसर्ग प्रेमी आहे आणि माझ्या आयफोन १३ प्रोसह पहाटे फिरायला जाणे मला आवडते. “गोल्डन अवर” हा निसर्गातील सर्वोत्कृष्ट गोष्टी समोर आणतो आणि छायाचित्रकारांना आनंद देतो.कोळ्याच्या जाळ्यावरील दव थेंबांनी माझे लक्ष वेधून घेतले आणि कोरड्या कोळ्याच्या रेशीमने हार कसा तयार केला, ज्यावर दव मोत्यासारखे चमकत होते ते पाहून मी मोहित झालो. हे निसर्गाच्या कॅनव्हासवरील कलाकृतीसारखे वाटले ” असं प्रज्वल चौगुलेने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हे छायाचित्र अप्रतिम आहे. मोठ्या बारकाईने कोळ्याच्या जाळ्यावरील दवबिंदू टीपले गेले आहेत. असं काहीतरी निसर्गात घडतं याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती असेल”, असं जज अपेक्षा मेकर यांनी सांगितलं. २५ जानेवारी २०२२ रोजी फोटोग्राफी प्रेमींसाठी जागतिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि १६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत प्रवेश स्वीकारण्यात आले.