Arjun Tendulkar Trolled: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या लेकाचे म्हणजेच अर्जुन तेंडुलकरचे आयपीएलमधील पदार्पण चांगलेच गाजले होते. दोन सामने मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळल्यावर नंतर मात्र अर्जुन पुन्हा सामन्यातून दिसेनासा झाला आहे. सोशल मीडियावर साहजिकच यावरून चांगलीच ट्रोलिंग सुरु आहे. काही वेळा तर यामध्ये प्रसिद्ध नावे सुद्धा अर्जुनची मस्करी करत आहेत. पण यामध्ये आता एका बोलबच्चन अभिनेत्याने अगदी तिखट शब्दात अर्जुनवर टीका केली आहे. अर्जुनला अयशस्वी म्हणताना या अभिनेता वजा स्वयंघोषित दिग्दर्शक निर्मात्याने त्याची तुलना उदय चोप्राशी केली आहे. नेमकं काय म्हणाला हा अभिनेता, चला पाहूया..

“यशस्वी बापाचा लेक हा अनेकदा अयशस्वीच सिद्ध होतो स्वतःच पाहा यश चोप्रा यांचा लेक उदय चोप्रा आणि आता सचिन तेंडुलकरचा मुलगा क्रिकेटचा उदय चोप्रा!” असे ट्विट या अभिनेत्याच्या अकाउंटवर दिसत आहे. साधारण भाषेने अंदाज आला असल्यास हे ट्वीट केआरके म्हणजेच कमाल आर खान याचे आहे. आश्चर्य म्हणजे यावर अनेकांनी केआरकेच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी कमेंटमध्ये अभिषेक बच्चनला सुद्धा टॅग केले होते. तर काहींनी उलट केआरकेवर ताशेरे ओढून तू स्वतः आयुष्यात काही यश मिळवलंय असा उलट प्रश्न केला आहे.

Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Ashutosh Sharma's Reaction After Defeat
‘त्या प्रशिक्षकांना मी आवडत नसे, ते मला संघात घेत नसत. यामुळे मी नैराश्यात गेलो’, आशुतोष शर्माचा संघर्ष
Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Andre Russell Closed His Ears as fans cheer when ms dhoni came to bat
IPL 2024: धोनीची एंट्री होताच जल्लोष टिपेला; आंद्रे रसेलने ठेवले कानावर हात- व्हीडिओ व्हायरल

“अर्जुन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा उदय चोप्रा”

हे ही वाचा<< “मला पर्वा नाही, जिंकायचं कसं…” विराट कोहलीने स्पष्टच दिली ‘ही’ उत्तरं; म्हणाला, “IPL नंतर मला परत…”

दरम्यान, अलीकडेच झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्सच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर दिसला नव्हता. या सामन्याच्या आधी अर्जुनला कुत्रा चावला होता असे त्याने मैदानात सांगितले होते. अर्जुनने दुसऱ्याच सामन्यात आपल्या करिअरची पहिली विकेट घेतली होती. तर सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध अर्जुन तेंडुलकरने शेवटच्या षटकात पाच धावा दिल्या. मात्र, पुढच्या सामन्यात पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी त्याला एकाच षटकात ३१ धावा चोपल्या होत्या. यानंतर अर्जुन पुन्हा खेळताना दिसलेला नाही.