राजकीय व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणे ही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सवय जनतेच्या अंगवळणी पडली आहे. केजरीवाल यांना देखील याचा अनुभव आल्यामुळे केजरीवालांनी यावेळी मोदी समर्थकांच्या खांद्यावरुन सरकारवर निशाणा साधण्याची नवीन शक्कल लढवली. यासाठी मोदी समर्थकांना गाढवाची उपमा देण्याच्या आशयाची एक पोस्ट त्यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली. यामध्ये त्यांनी एका गाढवाच्या माध्यमातून मोदीभक्तांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला.
मंदिरातील देवाची पूजा करणाऱ्या लोकांची गर्दी पाहून गाढवही देवाची पूजा अर्चा करण्यास सुरुवात करते. गाढवाची भक्ती पाहून देव या गाढवावर प्रसन्न होता. गाढवाला काय हवं अस विचारतो. यावेळी हे गाढव पुन्हा हाच जन्म मिळावा असे वरदान मागते. मात्र देव त्याला हे शक्य नसल्याचे सांगत दुसरी मागणी विचारतो. यावेळी गाढव दुसऱ्या वेळेस मला मोदी भक्त करा, सांगते. गाढवाच्या या मागणीवर देव गाढवाला म्हणतो की, हुशारी करु नकोस ‘मी दुसऱ्यांदा तुला गाढव बनवू शकत नाही’ असे अगोदरच सांगितले आहे.
मोदी सरकार जनतेला फसवत असल्याचे यापूर्वी देखील केजरिवालांनी बऱ्याचदा म्हटले आहे. यावेळी त्यांनी मोदी भक्तांच्या खांद्यावरुन मोदी सरकार जनतेला फसवत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र केजरीवालांची ही शक्कल त्यांच्यावरच उलटली.
अरविंद केजरीवालांच्या या ट्विटनंतर नेटीझन्सनी पुन्हा एकदा त्यांचे विचार अपरिपक्व असल्याचे दाखवून दिले. नम्रता नावाच्या एका नेटीझन्सने केजरीवालांना प्रत्युत्तरादाखल धन्यवाद दिले. तुम्ही या ट्विटच्या माध्यमातून जनतेच्या विश्वासास पात्र नसल्याचे सिद्ध केले असे ट्विट या तरुणीने केले. काहींनी तर केजरीवाल प्रतिस्पर्ध्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असल्याची प्रतिक्रिया दिली.
Supporters of different parties call each other names but this has to be a first where a CM is stooping so low. Disgraceful! @ArvindKejriwal
— Namrata (@dixitnamrata) October 23, 2016
@Ankita_Shah8 @ArvindKejriwal बेचारे भक्त ऐसे ही बदनाम है
अंधभक्ति तो आपिये करते है
किसी भी ट्वीट को कुछ भी कह के rt करते है
— प्रवीण™© (@prav2410) October 23, 2016