नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाट्यामोट्यात पार पडलं. बॉलिवूड सेलेब्रिटी, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक जगताशिवाय देशातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे जगाचं लक्ष वेधलं. इतकंच नाही तर या कार्यक्रमासाठी आघाडीचे हॉलिवूड स्टार्सही हजर होते. तर मनोरंजन विश्वा बरोबरच इतर अनेक क्षेत्रातली दिग्गज मंडळी या कार्यक्रमात उपस्थित होती. अंबानी यांच्या राजेशाही थाटातच त्यांनी सर्व पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं. नीता अंबानी यांच्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आता या उद्घाटन सोहळ्यातील जेवणाचा मेन्यू चर्चेत आला आहे.

पार्टीत टिश्यू पेपरऐवजी 500 रुपयांच्या नोटा? –

अंबानी परिवाराने आयोजित केलेल्या पार्टीतील जेवणाच्या मेन्यूचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, डायनींग टेबलवर काही स्वादिष्ट पदार्थांसोबत काही पैसे असल्याचं दिसत आहे. डायनिंग टेबलवर टिश्यू पेपरऐवजी या ५०० रुपयांच्या नोटा ठेवल्याचा दावा नेटकरी करत आहेत. मात्र या फोटोमागील सत्यता तपासली असता. व्हायरल फोटोमध्ये दिसणार्‍या खाद्यपदार्थाला “दौलत की चाट” असे म्हणतात. देशभरात हे स्ट्रीट फूड लोकप्रिय झाले आहे.ही उत्तर भारतात अतिशय लोकप्रिय पाककृती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल फोटो –

या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले असून अनेक मजेदार प्रतिक्रिया नेटकरी या फोटोवर करत आहेत.