Ayodhya Railway Station Viral Video : अयोध्या एक धार्मिक स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. प्रभू रामाचे जन्मस्थान म्हणून याची एक वेगळी ओळख आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात येथे भव्य मंदिरात रामलल्लाच्या बाल स्वरुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. नव्याने साकारलेल्या राम मंदिरामुळे हे शहर आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. येथील भव्य राम मंदिरात दरदिवशी हजारो लोक प्रभू रामाच्या दर्शनासाठी येतात.

अयोध्येचा दिवसेंदिवस विकास होत आहे. अयोध्येला लोकांच्या सुखसुविधेसाठी एक नवीन रेल्वे स्टेशन सुद्धा बांधण्यात आले पण सध्या अयोध्येच्या या रेल्वे स्टेशनवरील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून कदाचित तुम्हाला संताप येऊ शकतो कारण या व्हिडीओमध्ये दिसते की रेल्वे स्टेशनवर काही लोकांनी पान थुंकून अस्वच्छता निर्माण केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला अयोध्येचे नवीन रेल्वे स्टेशन दिसेल. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्हाला सुचना फलक दिसेल ज्यावर हिंदीमध्ये लिहिलेय, “धुम्रपान निषेध, थूंकना मना है,ज्वलनशील पदार्थ निषेध” पुढे व्हिडीओत जे दिसते ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की काही लोकांनी स्टेशनवर थुंकून अस्वच्छता निर्माण केली आहे. जागोजागी पान थुंकल्याचे डाग दिसत आहे. व्हिडीओ पाहून कोणालाही संताप येईल. नव्याने बांधलेल्या रेल्वे स्टेशनची ही अवस्था पाहून कोणालाही दु:ख होईल

[deleted by user]
by inindianrailways

हेही वाचा : Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Ok_Background_4323 या युजरने रेडिटवर हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. अनेक युजर्सनी थुंकणाऱ्या लोकांना अद्दल घडवण्याचा सल्ला दिला आहे. एका युजरने लिहिलेय, “जे लोक थुंकतात त्यांना स्वच्छ करण्यास सांगावे” तर एका युजरने लिहिलेय, “उत्तर प्रदेश आहे, काय अपेक्षा करणार?” आणखी एका युजरने लिहिलेय, “यामुळे राम परत जाणार”