Ayodhya Donation Box Money: अयोध्येच्या बहुचर्चित राममंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी निघालेल्या ट्रेन- बस गर्दीने तुडुंब भरल्या आहेत. अयोध्येतील गर्दी पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा केंद्रीय मंत्र्यांना दर्शनासाठी अजून पुढील काही दिवस तरी जाऊ नका असे सांगितले आहे. अशातच आता लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया वेबसाइट्सवर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत असलेला व्हिडिओ आढळून आला आहे.

व्हायरल व्हिडीओसह शेअर होत असणाऱ्या कॅप्शनमध्ये अशा दावा करण्यात येत होता कि हा व्हिडिओ राम मंदिराच्या दानपेटीचा असून नुकत्याच झालेल्या प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्यानंतर भाविकांना भरघोस दान दिले आहे, इतकं की दानपेटी पैशांनी ओसंडून वाहताना दिसतेय. अनेकांनी हा व्हिडिओ संतप्त कमेंट करत सुद्धा शेअर केला आहे. एवढ्या पैशात किती शाळा- रुग्णालये बांधून झाली असती. आपल्याकडे फक्त मंदिरांची अर्थव्यवस्था आहे अशा पद्धतीची टीका या व्हिडीओवर आहे. नेमकं यामध्ये कितपत तथ्य आहे हे पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Manisha ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील विविध प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही आमचा तपास InVid टूल मध्ये हा व्हिडिओ अपलोड करून सुरु केला. त्याद्वारे आम्हाला बऱ्याच किफ्रेम्स मिळाल्या. आणि त्यानंतर आम्ही या किफ्रेम्स वर रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला. या रिव्हर्स इमेज सर्च वरून आम्हाला हा व्हिडिओ ‘udaipurvlogz’ नावाच्या इंस्टाग्राम पेज वर सापडला. कॅप्शन मध्ये लिहिले होते कि हा व्हिडिओ, ‘श्री सांवरिया सेठ मंदिर’ चा आहे.

हा व्हिडिओ आम्हाला मंदिराच्या इंस्टाग्राम पेज वर देखील सापडला. त्यात कॅप्शन मध्ये लिहले होते कि दान पेटी उघडली असता त्यातून १२ कोटी ६९ लाख रुपये इतकी रक्कम प्राप्त झाली आहे. हा व्हिडिओ १६ जानेवारी रोजी अपलोड करण्यात आला होता.

तपशीलवार माहिती साठी आम्ही मंदिराचे अधिकारी नंद किशोर टेलर यांना संपर्क केला. त्यांनी पुष्टी केली कि हा व्हिडिओ १० जानेवारी रोजी श्री सांवरिया सेठ मंदिर घेण्यात आला होता, जेव्हा मंदिराची दान पेटी उघडली गेली.

हे ही वाचा<< पोटातील गॅसने विमानात झाला गोंधळ! सहप्रवासी भडकताच ‘तो’ उर्मटपणाने म्हणतो, “आता अजून सुगंधित..”, नेमकं घडलं काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष: व्हायरल व्हिडीओ अयोध्येतील राम मंदिरचा नसून राजस्थानमधील श्री सांवरिया सेठ मंदिरातील पैशांनी भरलेल्या दानपेटीचा आहे. व्हायरल दावा खोटा आहे.