scorecardresearch

ऐकावं ते नवलच! चुलीवरचं मटण, मिसळ आणि आईस्क्रीमनंतर आलाय चुलीवरचा बाबा; video viral

viral video : आतापर्यंत तुम्ही या बाबांना पर्वतावर, डोंगरावर, खडकावर बसलेलं पाहिलं असेल मात्र आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये हा भोंदू बाबा चक्क चुलीवर बसला आहे

baba sit on the stove
बाजारात आलाय चुलीवरील बाबा ( सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आपण अनेक वेळा भोंदूबाबाच्या प्रतापाचे किस्से एकले आहेत. नेहमीच वेगवेगळ्या बाबांच्या घटना समोर येत असतात. याचा बळी द्या आणि समस्या दूर करा, हे करा आणि आजार पळवा. भक्त गोळा करण्यासाठी हे बाबा वेगवेगळे स्टंटसुद्धा करत असतात. कधी जळत्या विस्तवावर चालतील तर कधी जळता कापूर गिळतील. अशा भोंदू बाबांचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आतापर्यंत तुम्ही या बाबांना पर्वतावर, डोंगरावर, खडकावर बसलेलं पाहिलं असेल मात्र आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये हा भोंदू बाबा चक्क चुलीवर बसला आहे. या बाबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

चुलीवरच्या बाबाचा video व्हायरल –

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक बाबा चुलीवर ठेवलेल्या लांबलचक तव्यावर बसला आहे. ही चूल पूर्णपणे पेटवलेली असून हा बाबा त्यावर निवांत बसला आहे. आगीमुळे चटका बसत असल्याचे कोणतेही भाव या बाबाच्या चेहऱ्यावर दिसत नाहीयेत.पांढरं धोतर घातलेला हा बाबा बिडी ओढताना दिसत आहे. अनेक लोक त्याच्या जवळ येऊन त्याचा आशिर्वाद घेत आहेत.मात्र हा बाबा त्यांना शिव्या देत आहे. तरीही भक्त बाबाच्या पाया पडताना दिसत आहेत. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – ‘क्या शेर बनेगा रे तू’! भटक्या कुत्र्यांना घाबरून सिंहाने ठोकली धूम, पाहा VIDEO

व्हायरल झालेला हा व्हिडीओ अकोल्याचा असल्याचं समोर आलंय. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ फक्त मनोरंजनापुरता मर्यादीत ठेवला तर काही नेटकऱ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणाविरोधी कायदा कुठे आहे असा सवाल केलाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 15:27 IST

संबंधित बातम्या