Mumbai Local Viral Video: मुंबई लोकलमधील महिलांची भांडणं आजवर आपण अनेकदा पाहिली असतील. पण प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा लोकलमधील महिला डब्याच्या सुद्धा दोन वेगळ्या ओळखी आहेत. भांडणांच्या पलीकडे जाऊन प्रेमाने, उत्साहाने, आनंदाने सण साजऱ्या करणाऱ्या मैत्रिणींची खास बाजू आज आपण लोकसत्ताच्या ‘तू ही दुर्गा’ उपक्रमाच्या निमित्ताने पाहणार आहोत.
बदलापूर स्थानकातून निघणारी सीएसएमटीकडे जाणारी ८ बाजून १० मिनिटांची लोकल आज नवरात्रीच्या रंगाढंगात सजली होती. उद्याच्या दसऱ्याची तयारी महिलांनी या लोकलच्या डब्यात आजपासूनच केली होती. दसऱ्याच्या दिवशी सुट्टी असल्याने नवरात्रीच्या नवव्या दिवशीच अनेक लोकलच्या ग्रुपचा ट्रेनमधला दसरा साजरा होतो. यंदाही सर्व हौशी महिलांनी दसऱ्याच्या निमित्त लोकलमध्ये फुलांच्या माळा, पताका लावून सजावट केली होती. लोकलच्या डब्यात लक्ष्मी देवीचा अफोटो लावून रीतसर दिवा- ताम्हण आणून तिचे पूजन केले गेले इतकंच नव्हे तर ट्रेनमध्येच महिलांनी गरब्याचा ताल सुद्धा धरला होता. ऐश्वर्या पालव यांनी या दसरा सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ लोकसत्तासह शेअर केला आहे.
Video: बदलापूरच्या लोकलमध्ये दिसलेले सुंदर दृश्य
हे ही वाचा<< ‘तू ही दुर्गा’ साठी काढलेली महालक्ष्मी रांगोळी पाहा! तुम्हीही लोकसत्ताच्या पेजवर झळकून नथ जिंकू शकता, त्यासाठी..
‘तू ही दुर्गा’ स्पर्धेत तुम्हीही व्हा सहभागी
तुम्हालाही जर का लोकसत्ताच्या पेजवर झळकण्याची इच्छा असेल तर त्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही तुमच्या नवरात्रीच्या सेलिब्रेशनचे रील बनवून लोकसत्ता लाईव्ह (@loksattaLive) या पेजला इन्स्टाग्रामवर कोलॅबमध्ये ऍड करू शकता. तुम्ही वाचकांनी शेअर केलेल्या रीलमधून एका बेस्ट रीलला आकर्षक नथ बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे तुमचा रील लवकरात लवकर पोस्ट करायला विसरू नका.