छतरपूच्या बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री अलीकडच्या काळात सातत्याने चर्चेत असतात. त्यांच्या दिव्यशक्ती आणि चमत्काराचे व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल होतात. आता धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका गुरूग्राममधील महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे. त्या मृत्यूचा उलगडा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केला आहे.
गुरूग्राममधील महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्या महिलेने ४ वर्ष झालं केसही धुतले नाहीत. महिलेच्या पतीचा खून झाल्याचा तिचं मत आहे. पण, पोलिसांनी याला आत्महत्या असल्याचं म्हटलं आहे. ही महिला धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या दरबारात जाते.
व्हिडीओत दाखल्यानुसार, धीरेंद्र कृष्ण शास्त्री दरबारात आलेल्या लोकांमधून पतीच्या मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी आलेल्या महिलेल्या स्टेजवर यावे, असं सांगतात. त्यानुसार एक महिला स्टेजवर जाते. तिच्याबरोबर पतीचा फोटोही असतो.
तेव्हा धीरेंद्र कृष्ण शास्त्री कागदावर काहीतरी लिहीत म्हणतात की, “पतीच्या हत्येचं रहस्य जाणून घेण्यासाठी आला आहात. पतीचा खून झाला असून, नंतर आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला आहे. शत्रू तुमच्या जवळपास फिरत आहेत. तुमच्यावर दबाब टाकला जात आहे. पतीच्या मृत्यूचं रहस्य समोर येत नाही आणि सीआयडी चौकशी होत नाही, तोपर्यंत तुम्ही आपले केस धुणार नाही.”
हेही वाचा : तुटलेल्या हेल्मेटचा वापर करण्यासाठी केला अनोखा जुगाड, Video पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
हे ऐकल्यावर महिलेला रडू आवरत नाही. तसेच, ४ वर्षापासून केस धुतलं नसल्याचेही महिला म्हणते. यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी म्हटलं, “याप्रकरणी सीआयडी चौकशी होईल. सध्या तुमचे केस धुवू नका. हनुमानजींची इच्छा असेल, तर लवकरच केस धुण्याची वेळ येणार आहे.”