Video Viral : मंगळागौर हा श्रावण महिन्यातील दर मंगळवारी नवविवाहीत महिलेने करावा, असा व्रत आहे. मंगळागौरच्या दिवशी मंगळागौरीची पुजा केली जाते. मंगळागौर दरम्यान महिला मराठमोळा पारंपारिक खेळ खेळतात आणि गाणी गातात. मंगळागौरचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर यापूर्वी पाहिले असेल.
सध्या असाच एक मंगळागौर खेळतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिला चक्क रेल्वस्टेशनवरच मंगळागौर खेळताना दिसत आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून बाईपण भारी देवा या चित्रपटाची आठवण येऊ शकते.

हा व्हायरल व्हिडीओ रेल्वे स्टेशनवर शुट करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये १०-११ महिला दिसताहेत आणि त्या नऊवारी नेसलेल्या आणि सुंदर साज श्रृंगार करुन दिसत आहे.
व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या महिला स्टेशनवरच मंगळागौर खेळताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. महिलांचा आत्मविश्वास खरंच कौतुकास्पद म्हणावा लागेल. हा व्हिडीओ मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरील आहे.

हेही वाचा : नवरीच्या एन्ट्री वेळी चिमुकल्याची मध्येच लुडबूड, वैतागलेल्या नवरीने…; व्हायरल होतोय व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rupamore77 या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शुट करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक लोकांनी या महिलांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
एका युजरने लिहिलेय, “बस एवढा आत्मविश्वास पाहिजे. टीव्हीवरील कलाकार घराबाहेर पडून नेहमी शूट करतात पण एखादी सामान्य स्त्री असं काही छान करते तर खूप भारी वाटतं.” तर एका युजरने लिहिलेय, “शब्द नाही.. असा आत्मविश्वास असावा.. ताई हे मुंबईकरच करू शकतात.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आपली परपंरा जपली पाहिजे”
यापूर्वीही महिलांचा असाच एक व्हिडीओ चर्चेत आला होता. चक्क मुंबई लोकलमध्ये महिलांचा मंगळागौर खेळताना व्हिडीओ व्हायरल झाला होता.