Viral Video : संस्कार ही आयुष्यातील खूप महत्त्वाची शिदोरी असते जी आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देते. संस्कारामुळे व्यक्तीचा विकास होतो. त्यामुळे लहानपणीचे बालमनावर संस्कार रुजवले जाते. खरं तर बालसंस्कार ही काळाची गरज आहे. मुलांना चांगली शिस्त लागावी, यामुळे आईवडील मुलांवर चांगले संस्कार करतात. सध्या असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुरली गाईला पोळी खाऊ घालताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकली दिसेल जिच्या हातात पोळी आहे आणि घराबाहेर पडताना दिसते. तेव्हा तिची आई तिला विचारते – कुणाला देते बेटा
चिमुकली – हंबाला, हंबाला पोळी देते. हंबाला भूक लागली.
चिमुकली – हंबा गेली ना?
आई – हो न बेटा, हंबा गेली ना..
चिमुकली – कुठे गेली?
आई – आली आली आली
चिमुकली – आता दुसरी हंबा आली. आता पांढरी हंबा आली
त्यानंतर चिमुकली हंबाला पोळी खाऊ घालते.
चिमुकली – हंबाचा आवाज नव्हता ना..
आई- हंबाने मान हलवली का मग?
चिमुकली – नाही हलवली मान
आई – हंबा थँक्यू का म्हणाली नाही?
आई – हंबाने थँक्यू नाही म्हटलं तुला? हंबा नाही बोलत बेटा. ती हो म्हणाली. तिने मान हलवली ना.. ती थँक्यू म्हणाली.
पण व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चिमुकली तिला शेवटपर्यंत वाईट वाटतं की गाईने तिला धन्यवाद म्हणाली म्हणून. चिमुकलीचा हा निरागसपणा पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
mahira_3647 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बालमनावरील सात्त्विक संस्कार..” तर एका युजरने लिहिलेय, “किती निरागस आहे बाळ तू” आणखी एका युजरने लिहिलेय, “माहिराच्या आईचा आवाज खूपच गोड आहे” एक युजर लिहितो, “वढ्या लहान वयात येवढी छान समज आहे माहिराला.. खुप छान संस्कार आहेत तिच्यावर” तर एक युजर लिहितो, “देवाने सर्व गोडवा माहिरालाच देऊन टाकला” अनेक युजर्सनी या चिमुकलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.