Bangladesh Viral Video: लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर होत असलेला एक व्हिडिओ आढळला, जो बांगलादेमधील अल्पसंख्याकांच्या अलीकडील रॅलीचा असल्याचा दावा करण्यात आला होता. तपासादरम्यान आम्हाला आढळले की हा व्हिडिओ बांगलादेशातील अवामी लीगच्या रॅलीचा आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

काय होत आहे व्हायरल?

X युजर Mr Tyagi ने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला.

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन बघा.

https://archive.ph/UzNQF

इतर वापरकर्ते देखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडिओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून तपास सुरू केला.

हेही वाचा… आंदोलक शिरले बांग्लादेशच्या पंतप्रधानांच्या घरात, स्विमिंग पूलमध्ये मारल्या उड्या अन्…; VIDEOतील गर्दीतून सत्य आलं समोर

आम्हाला यूट्यूब चॅनल SM media house20 वर अपलोड केलेला हाच व्हिडिओ सापडला.

व्हिडिओचे शीर्षक होते (अनुवाद): पहा गोपालगंजच्या रहिवाशांचे हात, भयानक हल्ला || गोपाळगंज || बांगला बातम्या

त्यानंतर आम्ही बांगलादेशातील वरिष्ठ फॅक्ट चेकर तन्वीर महताब अबीर यांच्याशी संपर्क साधला, ज्याने मूळ व्हिडिओकडे नेणाऱ्या आणखी काही लिंक्स शेअर केल्या. ही राजकीय रॅली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा… भारत की पाकिस्तान? शिक्षकाचे विद्यार्थ्यावर अत्याचार, छतावर उलट लटकवलं अन्…; VIRAL VIDEO नेमका आहे कुठला? पाहा

चॅनल 21 न्यूजच्या फेसबुक पेजने कॅप्शनसह व्हिडिओ शेअर केला होता (अनुवादित): गोपालगंजमधील लोक सतत निदर्शने करत आहेत. आज काठी काजुलिया माळीघाटी युनियनचे लोक एकत्र आले आहेत.#channnel21 #NewsUpdate #Channel21News #Gopalganj #Protest #AwameeLeague #Kajulia

https://www.facebook.com/watch/?mibextid=Ls6BEq&v=1922292001532645&rdid=8ps6Y4mWcIi86OKK

फेसबुक पेज खोमेनी एहसानने देखील कॅप्शनसह व्हिडिओ शेअर केला आहे (अनुवादित): बांगलादेशचा रक्तरंजित दिवस. गोपालगंज अवामी लीग.

https://www.facebook.com/watch/?v=1602231880355964

आम्हाला बांगलादेश अवामी लीग समर्थकांच्या फेसबुक ग्रुपवर व्हिडिओ देखील सापडला.

https://www.facebook.com/groups/awamileague.1949group/posts/1483287668905520/

व्हिडिओला कॅप्शन दिले होते (अनुवाद): आज दोन युनियन लोक जमले. काठी काजुलिया माध्यम आहे. 11/08/2024

व्हिडिओमध्ये 11 ऑगस्ट 2024 ही तारीख नमूद करण्यात आली होती.

हेही वाचा… ‘आजचा दिवस असा जगा की…’ कमला हॅरिस यांचा गोंधळात टाकणारा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल; पण नेमकी खरी बाजू काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष: बांगलादेशच्या अवामी लीगच्या समर्थकांनी काढलेली रॅली बांगलादेशातील अल्पसंख्याकांनी काढलेली रॅली म्हणून शेअर केली जात आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.