बांग्लादेशचं हे व्हायरल सेन्सेशन आठवतंय का? हिरो आलम म्हणून स्वतःला जगापुढे घेऊन आलेल्या या गायकाला बांग्लादेश पोलिसांनी अटक केली होती. तब्बल आठ तासांच्या कोठडीनंतर त्याची सुटका करण्यात आली. मात्र ज्या कारणासाठी आलमला अटक केले गेले ते कारण सध्या बरेच चर्चेत आहे. बांग्लादेशच्या क्लासिक गाण्यांना रिमिक्स करून बेसूर आवाजात आपल्या युट्युब चॅनेल वर सादर केल्यास आलमला पोलिसांना बेड्या ठोकल्याचे समजत आहे. अलीकडेच त्याने नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर आणि बांगलादेशचे राष्ट्रीय कवी काझी नजरुल इस्लाम यांच्या दोन क्लासिक गाण्यांसह सुद्धा असेच विक्षिप्त रिमिक्स केले होते ज्यावरून ही कारवाई करण्यात आली.

हिरो अलोम याला सुमारे 2 मिलियन फेसबुक फॉलोअर्स आणि यूट्यूबवर जवळपास 1.5 मिलियन सबस्क्राइबर आहेत. अरब पद्धतीचा वेष करून त्याने शूट केलेल्या ‘अरेबियन सॉन्ग’ ला तब्बल १७ मिलियन व्ह्यूज आहेत. यामध्ये तो बेसूर आवाजात उंटासह वाळूच्या ढिगाऱ्यांवर गाताना पाहायला मिळतो.

आलमने एएफपीला माहिती देत मागील आठवड्यात पोलिसांनी त्याचा ‘मानसिक छळ’ केल्याचा दावा केला होता. तो ठाकूर आणि नजरल यांची गाणी का गातो असे विचारून पोलिसांनी गाणे थांबवण्यास सांगितले तसेच तो गायक होण्यासाठी खूप कुरूप आहे आणि त्याच्या विरुद्ध अनेकांच्या तक्रारी आल्याने त्याने त्वरित माफी नामा जाहीर करावा असेही सांगितले होते.

हिरो आलमला अटक

पोलिसांच्या माहितीनुसार, आलमच्या विरुद्ध खूप तक्रारी येत होत्या. तसेच त्याने परवानगीशिवाय पोलिसांचा गणवेश परिधान केल्याचेही आरोप होते. त्याने पारंपरिक गाण्यांची, कलाकृतींची अक्षरशः वाट लावली आहे असेही तक्रारपत्रात म्हंटल्याचे पोलिसांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरंतर जेव्हा पोलिसांना आलमने आपण गाण्यांची नासधूस थांबवू असे सांगितल्यावर त्याची सुटका झाली मात्र ऐकेल तो आलम कसला.. त्याने पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच त्याने नवा व्हिडीओ बनवून कैद्याच्या वेशात तुरुंगाच्या सेटअप मध्ये गाणी गायली आहेत व आपल्याला फाशी दिली जाणार असल्याचेही व्हिडिओमध्ये संकेत दिले आहेत.

या एकूण प्रकारावर अनेकांनी पोलिसांची बाजू घेतली तर कलाकारावर अशी बंधने घालणे गैर आहे असे म्हणत काहींनी आलमची बाजू घेतली आहे.आलम ने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे याशिवाय 2018 मध्ये बांगलादेशच्या संसदीय निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून 638 मते मिळवली असाही दावा त्याने केला आहे.