प्राणी संग्रहालयात येणाऱ्या काही पर्यटकांना बिचाऱ्या मूक्या प्राण्यांची खोड काढण्याची खूपच वाईट सवय असते. त्यांना चिडवणं, त्रास देणं असे काहीना काही प्रकार त्यांचे सुरूच असतात. पण असं करणं किती महागात पडू शकतं याची कल्पना कदाचीत या लोकांना नसेल. तेव्हा अशा लोकांना हा व्हिडिओ जरूर दाखवा.

थायलंडमधल्या एका ३६ वर्षीय तरूणाने अस्वलाला  त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण हे करणं त्याला भलतंच महाग पडलं. पिंजऱ्यातल्या अस्वलाला पाहून हा तरूण त्याला वाकुल्या करून दाखवत होता. एवढंच नाही तर हातात खाणं असूनही तो या अस्वलाला देत नव्हता. गंमत म्हणून या तरूणाने खाद्यं त्याच्या पुढ्यात नेलं आणि जसं अस्वल खाद्य खाण्यासाठी पुढे आलं तसं त्याने हातातलं खाद्य बाजूला केलं. असं तो बराच वेळ करत होता. शेवटी राग अनावर झालेल्या अस्वलाने या पर्यटकावर हल्ला केला. या हल्ल्यात तो जबरदस्त जखमी झाला. अस्वलाचा हल्ला इतका गंभीर होता की तो पिंजऱ्यातच बेशूद्ध पडला. या पर्यटकाचा अस्वल जवळजवळ जीवच घेणार होता पण ऐनवेळी काही लोक त्याच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी अस्वलाच्या तावडीतून त्याची सुटका केली.

इथल्या प्राणीसंग्रहालयातील अनेक प्राण्यांना पुरेसे अन्न मिळत नाही. त्यांना उपाशी राहावे लागते. कदाचीत या पर्यटकाने अन्नाचं आमिष दाखवून त्याला ते दिलं नाही म्हणून अस्वलाने त्यावर हल्ला केला असावा असं इथल्या सुरक्षा रक्षकाचं म्हणणं आहे.