अस्वल हा असा प्राणी आहे, जो एकदा का चिडला तर मग माणसांचा बळी घेतल्याशिवाय शांत होत नाही. एक प्रकारे अस्वलही जंगलाचा राजाच असतो. अस्वलाची वृत्ती चंचल असते. त्याची दृष्टी अधू असल्याने त्याला लांबचं दिसत नाही. त्यामुळे माणसाची दृष्टिभेट अचानक झाली की अस्वल बावचळतं. त्यावेळी तो बेताल होऊन कधी कधी माणसांवर हल्ला करतो. त्यामूळे अस्वल दिसायला कितीही गोड दिसत असला तरी तो अचानक कधी समोर आलाच तर मनात धडकी भरतेच. पण सध्या एक अस्वल आणि महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. जो पाहून कुणाच्याही ह्रदयाचे ठोके वाढतील. या व्हिडीओमध्ये महिलेच्या घरासमोर अचानक एक भयानक अस्वल आलेला दिसून येतोय. त्यानंतर महिलेने घाबरून न जाता या मांसाहारी अस्वलासोबत फक्त मैत्रीच केली नाही तर त्याच्याकडून कामही करवून घेतलंय. हे वाचून तुम्हाला विश्वास होणार नाही, त्यासाठी हा व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसणारी महिला अमेरिकेतील न्यू जर्सी येथील एका निर्जन भागात राहते. सुसान केहो असं या महिलेचं नाव असून तिने स्वतः हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. रात्रीच्या वेळी या महिलेच्या घराबाहेरून काही विचित्र आवाज ऐकू येऊ लागला होता. निर्जन भागात आपल्या घरासमोर अत्यंत गुरगुरणारा आणि जोराने घेतल्या जाणार्‍या श्वासांचे आवाज ऐकून येऊ लागल्यानंतर या महिलेने तिच्या घराचं दार हळूच उघडून पाहिलं. घराबाहेर मांसाहारी अस्वल उभा असल्याचं पाहून काही वेळासाठी व्हिडीओ पाहणाऱ्यांच्या मनात धडकी भरते. तर प्रत्यक्षात या महिलेची काय अवस्था झाली असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. घरासमोर हा मांसाहारी अस्वल पाहून ही महिला सुद्धा सुरूवातीला थोडी घाबरून जाते. पण त्यानंतर या महिलेने जे केलं ते पाहून लाखो लोकांनी तिचं कौतुक करायला सुरूवात केली.

या महिलेने सांगितले की, तिच्या घराच्या व्हरांड्यात उभे असलेले काळे अस्वल पाहून ती आधी थोडी घाबरली होती. पण त्यानंतर तिने जे केलं त्यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. खरं तर, महिला घाबरून न जाता अगदी निडरपणे या अस्वलासमोर आली आणि म्हणाली, ‘मिस्टर बेअर, कृपया माझा घराचा दरवाजा बंद कराल का?’. पुढे काय झालं ते पाहण्यासाठी हा व्हिडीओ पहा…

आणखी वाचा : भूतासोबत खेळताना कुत्र्याचा VIDEO VIRAL? ; भयानक दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद, पाहून घाबरून जाल

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ८०० वर्षांपासून हा ज्वालामुखी शांत होता…पण जेव्हा याचा उद्रेक झाला, तेव्हाचे हे दृश्य पाहून तुम्ही थक्क व्हाल, पाहा VIRAL VIDEO

महिलेने अस्वलासोबत केली मैत्री

अस्वलाने चक्क या महिलेच्या आज्ञेचं पालन केलं आणि त्याने महिलेच्या घरचं दार ओढून दार बंद केलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिलेच्या सांगण्यावरून अस्वलाने आपल्या तोडांने दार पुढे ओढलं आणि दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओमध्ये तुम्ही ऐकू शकता की ती महिला अस्वलाला म्हणाली, ‘मिस्टर बेअर, तुम्हाला दार बंद करावे लागेल, कारण थंड हवा येत आहे.’

महिलेने आदेश दिल्यानंतर हे असे अस्वल दार बंद करण्याचा प्रयत्न करतो. सुरूवातीला या अस्वलाला दरवाजा पूर्णपणे बंद करता येत नाही. पण महिलेने पुन्हा या अस्वलाला दार बंद करण्याचा आदेश दिला. त्यानंतर या भयानक अस्वलाने पुन्हा एकदा तोंडाने दरवाजा पकडला आणि दरवाजा पूर्णपणे बंद केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

आणखी वाचा : आजोबा रॉक्स विदेशी शॉक! फॉरेनरसोबत भर रस्त्यात आजोबांचा जबराट डान्स, पाहा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या महिलेने हा प्रसंग स्वतःच्या मोबाईलमध्ये शूट करून तो युट्यूब चॅनलवरून शेअर केलाय. आतापर्यंत या व्हिडीओला ९३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकजण अस्वलाची हुशारी पाहून हैराण झाले आहेत. अस्वलाचा हा मजेशीर व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.