सोशल मीडियावर जंगलातील प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ पाहायला नेटिझन्सला देखील खूप आवडते. नुकताच अस्वलाचा एक व्हिडीओ समोर आलाय. अस्वल हा असा प्राणी आहे की, पाण्यात माशांची शिकार करण्यात एकदम पटाईत आहे. माशांची शिकार करण्यासाठी अस्वल नेहमी वेगळ्या-वेगळ्या कल्पना वापरत असते. नदी आणि तलावात माशांची शिकार करण्यासाठी अस्वल वाट पाहत असते. मात्र आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तो चक्क माणसांसोबत बसून खात आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
एवढ्या भल्यामोठ्या अस्वलाच्या बाजुला कोण बसेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, मात्र हे अस्वल चक्क या माणसांच्या बाजुला बसून जेवतोय. एक जंगली भाग दिसत आहे आणि त्याच्या मध्यभागी एक टेबल आणि दोन बेंच ठेवण्यात आले आहेत. तिथे 5 जण बसलेले दिसतायेत. यामध्ये एक महिलाही आहे. त्यांच्यासोबत एक काळे अस्वलही बसले आहे. एक तरुण आपल्या हाताने ब्रेडला लोणी किंवा काहीतरी लावताना दिसतो आणि तो अस्वलाला खायला देतो. अस्वलही शांततेत बसून मोठ्या आवडीने खात आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – VIDEO : बापरे!, एस्केलेटरमध्ये अडकलं चिमुकल्याचं डोकं; वेदनेमुळे भयंकर विव्हळला, बघा कशी केली सुटका!
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओला लाखो व्ह्यज गेले आहेत. नेटकरीही पाहून अवाक् झाले आहेत.