जगात आश्चर्यकारक लोकांची कमतरता नाही. क्युबातील हवाना शहरातील अशाच एका आश्चर्यकारक व्यक्तीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. कारण तो स्वत:च्या हातांवर जोरात हातोडा मारुन घेतो. त्याचं हे अनोखं कृत्य पाहण्यासाठी अनेक लोक गर्दी करतात आणि त्याचे व्हिडिओ देखील शूट करतात.
शरीरावर ओरखडाही येत नाही
या व्यक्तीला हातोड्याने स्वत:ला मारताना पाहून अनेकांना एकच प्रश्न पडतो की एवढं मारल्यानंतरही त्याच्या अंगावर एक ओरखडाही कसा येत नाही. क्यूबातील या “आयर्न मॅन”चे लिनो टॉमसेन असं नाव आहे. तर त्याची पुढील माईक टायसन बनण्याची इच्छा आहे. हातोड्याने स्वतःवर लाखो वार करण्याबरोबरच तो एक व्यावसायिक बॉक्सर बनण्याचे प्रशिक्षण घेत होता आणि बॉक्सिंगसाठी कॅरेबियन बेटावरून मेक्सिको सिटीत राहण्यासाठीही तो गेला होता.
हेही पाहा- प्रवाशांनी भरलेल्या मेट्रोत तरुणीची स्टंटबाजी, व्हायरल व्हिडीओ पाहून डोकंच धराल
२७ बॉक्सिंग सामने जिंकले
हवानामध्ये रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत, लिथ टॉमसेनने सांगितले, “मी नॉकआउटद्वारे २७ सामने जिंकलो, परंतु मी निवृत्त झालो कारण शेवटच्या सामन्यात मी माझ्या प्रतिस्पर्ध्याची कवटी तोडली ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.” त्याने पुढे सांगितलं की, “मी लढाईतून कमावलेले सर्व पैसे मी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला दिले,” ती रक्कम जवळपास ८३ लाखांपेक्षा जास्त होती. तसेच आपण पुन्हा कधीही न लढण्याची शपथ घेतली.”
हेही वाचा- अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या ‘व्हायरल मिम डॉग’ चीम्सचे निधन, नेटकऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली
करिअर सोडल्याचा पश्चाताप नाही
आता टॉमसेन हवानामधील समुद्रकिनाऱ्यांवर लोकांसमोर हातोड्याने स्वतःला मारतो आणि त्यांच्याकडून मिळालेल्या पैशांने स्वत:चा उदरनिर्वाह करतो. टॉमसेन म्हणाला, बॉक्सिंगमधील संभाव्य करिअर सोडल्याबद्दल त्याला कोणताही पश्चात्ताप होत नाही. तसेच आपल्याला या क्षेत्रात परत येण्यासाठी हजारो, लाखो डॉलर्सची ऑफर देण्यात आली आहे, कारण त्यांना माझ्या क्षमता माहिती आहेत. पण आता मी ते पूर्णपणे सोडून दिलं आहे, असंही तो म्हणाला.