सध्या सोशल मीडियावर अशी एक तरुणी व्हायरल होत आहे, जी एका चांगल्या बॉयफ्रेंडच्या शोधात आहे. पण तिचा जो कोणी बॉयफ्रेंड बनेल त्याला ५४ अटी पूर्ण कराव्या. मुलीने सोशल मीडियावर अटींची एक लांबलचक यादी शेअर केली आहे. जी आता व्हायरल होत आहे. याच नसबंदीचाही समावेश आहे.

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, या तरुणीचे नाव ज्युली जिंकू असे आहे. मेक्सिकोची रहिवासी असलेली ज्युली ही सोशल मीडिया इन्फ्यूएंसर असून तिचे ट्विटरवर १ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. त्याचवेळी इन्स्टाग्रामवर तिचे सुमारे दीड लाख फॉलोवर्स आहेत. अलीकडेच त्याने ५४ अटींची एक लिस्ट शेअर केली आहे. ज्यात ज्युलीने म्हटले की, जो या लिस्टमधील अटी पूर्ण करेल तो तिचा बॉयफ्रेंड होईल.https://www.instagram.com/p/Crt1j2UAIJR/?utm_source=ig_web_copy_link

ज्युलीच्या मते, जो कोणी तिच्या ५४ अटी मान्य करेल आणि त्यांचे पूर्ण पालन करेल त्याला ती फक्त बॉयफ्रेंडच नाही तर पुढे त्याची जोडीदार म्हणून निवड करेल. ज्युलीने तिच्या अटींचे तीन भाग केले आहेत- पहिला- Top Requirements, दुसरा – Second Priority, तिसरा – Extras.

ज्युलीच्या अटी नेमक्या काय आहेत?

ज्युलीने तिच्या ५४ अटी तीन भागांमध्ये शेअर केल्या आहेत. सध्या ज्युलीची ही पोस्ट ४ लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. ज्युलीने पुढीलप्रमाणे काही अटी ठेवल्या आहेत – त्यात तिच्या बॉयफ्रेंडला मूल नको असावे, तिला नेहमी गिफ्ट्स आणि डिनर किंवा बाहेर जेवणासाठी घेऊन जाणारा असावा, त्याला फिजिकल कॉन्टॅक्ट आवडणारा असावा, फेमिनिज्म आणि LGBT + मूव्हमेंटला सपोर्ट करणारा असावा. जास्त धार्मिक नसावा. सोबत तो कार्टून आणि भूताचे डेंजर फिल्म आवडीने पाहणारा असावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय आणखी काही अटी तिने घातल्या आहेत. त्या म्हणजे बॉयफ्रेंड दारु, सिगारेटसारखी कोणतीही नशा करणारा नसावा. मसालेदार पदार्थ खाणारा नको. विशेष म्हणजे तो, सोशल मीडियावर जास्त मुलींना फॉलो करणारा नसावा आणि त्याची कोणी दुसरी गर्लफ्रेंड नसावी. त्याची आर्थिकस्थिती चांगली असली पाहिजे. वय २५ ते ३५ वर्षांदरम्यान असावे. सोबतच त्याच्याकडे स्वत:ची एक कार असली पाहिजे आणि तो उंचीला तिच्यापेक्षा जास्त असला पाहिजे. अशाप्रकारे ज्युलीने तिच्या होणाऱ्या बॉयफ्रेंडलसाठी ५४ अटी ठेवल्या आहे.