अनेकांना कुत्रा, मांजर पाळायला आवडतात. प्राण्यांनाही प्रेमाची भाषा कळते. काही लोकांना प्राण्यांबरोबर खेळायला फार आवडते पण त्यांची काळजी मात्र नीट घेता येत नाही. कित्येकजण जण हौस म्हणून कुत्रा मांजर पाळतात पण त्यांना काय हवे नको ते मात्र पाहत नाही. पण काही लोक मात्र पाळीव प्राण्यांना जीवापाड जपतात. त्यांच्यावर घरातल्या व्यक्तीसारखं प्रेम करतात. असे लोक प्राण्यांना एकटे सोडून देत नाही तर नेहमी त्यांची साथ देतात. अशाच एका प्राणीप्रेमी रिक्षाचालकाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण व्यक्ती त्याच्या कुत्र्याला घेऊन रिक्षा चालवताना दिसत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चला काय आहे हे प्रकरण सविस्तर जाणून घेऊ या…..

हा हृदयस्पर्शी व्हिडीओ बेंगळुरूमधील एक रिक्षा चालकाचा आहे. एक तरुण व्यक्ती त्याच्या मांडीवर कुत्र्याला ठेवून रिक्षा चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ १७फेब्रुवारी रोजी एका वापरकर्त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. व्हिडिओमध्ये, कुत्राही रिक्षाचा हँडलबार धरून रिक्षाचालकाबरोबर बसला आहे. गजबजलेल्या रस्त्यावरून एकत्र फिरताना रिक्षाचालक आणि या गोंडस कुत्र्याने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. रिक्षाचालक आपल्या पाळीव कुत्र्याला त्याच्या मांडीवर आरामात बसवून रिक्षा चालवताना दिसत आहे. एका ठिकाणी रिक्षा थांबलेली असताना हा पाळीव कुत्रा इकडे तिकडे पाहताना दिसत आहे.

हेही वाचा – “पोटासाठी काही पण..!” डोक्यावर केळ्याचं मुकुट, गळ्यात संत्र्याचा हार घालून रस्त्यावरील फळ विक्रेत्याचा Video Viral

pawful.world नावाच्या पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “आज मी एका रिक्षाचालकाला कुत्र्याला बरोबर घेऊन रिक्षा चालवताना पाहिले. उबेर ड्रायव्हर : टॉमी” व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. प्राणी प्रेमींना हा व्हिडीओ प्रचंड आवडला असून, त्यांनी कमेटंचा वर्षाव केला आहे. काही लोकांनी हे दृश्य बंगळुरुमध्ये सामान्य आहे असे सांगितले आहे.

हेही वाचा – अविश्वसनीय! चक्क समुद्रात हरवलेले पाकीट ८ महिन्यांनी सापडले! महिलेची पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ पाहून एकाने लिहिले,मी बंगळुरू्च्या वाहतूक कोंडीत अडकले माझी काहीच हरकत नाही” दुसऱ्याने लिहिले की,”बंगळुरूमध्ये अशी दृश्य पाहायला मिळणे अत्यंत सामान्य गोष्ट आहे. मला खात्री आहे की ते (तुलनेने बोलायचे तर) कुत्र्यांसाठी स्वर्ग आहे. मी येथे १० वर्षांपासून आहे आणि येथील लोकांना भटक्यां प्राण्यांसाठी जेवढे प्रेम आणि काळजी वाटते ती आहे ते पाहणे हृदयस्पर्शी आहे आणि माझी इच्छा आहे की, भारतातील इतर शहरे त्याचे अनुकरण करू शकतील. मला वाटते की, ही एक सांस्कृतिक गोष्ट आहे. तरीही, मला अशा माणसाला जगात सर्वत्र यश मिळो”