सामान्य व्यक्तीपासून VIP व्यक्तीपर्यंत सर्वजण ऑटोरिक्षाने प्रवास करतात. सेलेब्स कित्येकदा रिक्षामध्ये बसलेले दिसतात. रिक्षाचालकांचे आश्चर्यकारक व्हिडिओ समोर येत असतात. कर्नाटकमधील बंगळुरुच्या एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो रडताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नवा वाद पेटला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंगळुरूच्या एका रिक्षाचालकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो कन्नड भाषेत बोलताना दिसत आहे.एका लोकल चॅनेलबरोबर संवाद साधताना रिक्षाचालकाने ४० रुपये दाखवले. रडत रडत रिक्षाचालकाने सांगितले की, त्याने सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १ वाजता रिक्षा चालकाने फक्त ४० रुपये कमावले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ

२५ जूनला @ZavierIndia नावाच्या यूजरने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केले आहे. व्हिडीओ शेअर करताना जेव्हिअरने सांगितले की, ”बंगळूरूच्या एक ऑटोचालक रडत आहे कारण त्याने सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत रिक्षा चालवली आणि फक्त ४० रुपये कमावले. हे कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकारच्या फ्री बस राईड्चा परिणाम आहे. लोकांना गरिबीमध्ये ढकलले जात आहे.”

हा व्हिडीओ कोणत्या तारखेचा आहे, कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

हेही वाचा – नकारामुळे वैतागून पठ्ठ्याने वाढवली स्वत: उंची, सर्जरीसाठी खर्च केले तब्बल ६६ लाख रुपये, पाहा व्हिडीओ

लोकांनी व्हिडीओवर दिल्या प्रतिक्रिया

या व्हिडीओमुळे ट्विटरवरमध्ये लोकांचे दोन गट तयार झाले आहेत. काहीजण सरकारला दोष देत आहेत,तर काही लोकांनी रिक्षाचालकाबरोबर योग्य घडले असे म्हटले आहे.

एकाने लिहिलेय, ”कर्नाटक कॉंग्रेसमध्ये महिलांसाठी जे फ्री बस सेवा सुरू केली आहे त्यांचा परिणाम आहे. महिला आणि पुरुष एकसमान नसतात. या योजनेमध्ये हे योग्य असल्याचे सिद्ध होते. मोफत बस सेवेने राज्याचा कारभार चालू शकत नाही, नोकरी मिळू शकत नाही.”

दुसऱ्याने लिहेलेय की, ”मला वाटते की या रिक्षाचालाकाबरोब जे घडले ते योग्यच आहे. एकदा मला चर्च स्ट्रीटपासून चालुक्य हॉटेलपर्यंत जाण्यासाठी २०० रुपये मागितले होते. रिक्षाचालक लालची झाले आहे विशेषत: बंगळुरूचे.”

तिसऱ्याने लिहलेय, हे कसे शक्य आहे? महिलांसाठी मोफत बस सेवा. बसमध्ये महिला जास्त प्रवास करतात. सर्व पुरुषांनी स्वत:ला बंद करून ठेवलेय का?

हेही वाचा – बाईकचा टेबल अन् प्लॉस्टिक पिशवीची प्लेट! घाईघाईत जेवत होता भुकेला डिलिव्हरी बॉय; ह्रदयद्रावक Video पाहून नेटकरीही झाले भावूक, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटते?