Viral Post : आपल्यापैकी अनेक जण दररोज रिक्षांमधून प्रवास करत असतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे रिक्षा चालक महिन्याला किती पैसे कमावत असतील? बेंगळुरूमध्ये इंजिनिअर आकाश आनंदानी यांच्यासाठी त्यांचा रिक्षाप्रवास याबाबतीत डोळे उघडणारा ठरला आहे.
४ ऑक्टोबर रोजी आनंदानी एका ऑटोमध्ये बसले आणि त्यांनी या प्रवासादरम्यान अगदी सहज केलेल्या गप्पांमधून ऑटोचालकाने त्यांना जे काही सांगितलं त्यामुळे ते थक्क होऊन गेले. त्या ऑटोचालकाने त्यांना सांगितलं की त्याच्याकडे ४ ते ५ कोटी रुपये किमतीची दोन घरे आहेत. या दोन्ही घरांतून त्याला महिन्याला २ ते ३ लाख रुपये भाड्याचे उत्पन्न मिळते, तसेच त्याने एका AI स्टार्टअपमध्ये गुंतवणूक देखील केली आहे. आनंदानी यांनी सोशल मीडियावर यासंबंधी एक पोस्ट करत हा प्रसंग सांगितला आहे.
आनंदानी यांनी कमेंटमध्ये स्पष्ट केले की, ऑटोचालकाच्या हातात ॲपल वॉच आणि कानात एअरपॉड्स पाहून त्यांनी त्याच्याशी बोलण्यास सुरुवात केली होती. हा ऑटोचालक त्याचा पहिलं काम म्हणून फक्त विकेंडच्या दिवशी ऑटो चालवण्याचे काम करतो.
आनंदानी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, “बंगळुरू हे खूपच आश्चर्यकारक आहे, येथे रिक्षा चालवणाऱ्या भैय्याने सांगितले की त्याच्याकडे ४ ते ५ कोटी किमतीची दोन घरे आहेत, ज्याच्या भाड्यातून तो महिन्याला २-३ लाख रुपये कमावतो., आणि तो एका एआय बेस्ड स्टार्टअपचा संस्थापक/गुंतवणूकदार देखील आहे.”
ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून याला १५०० हून अधिक लाईक्स आणि ६७ हजरांहून अधिकल व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या पोस्टच्या खाली कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. या पोस्टच्या खाली संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींनी त्या ऑटोचालकाच्या मेहनतीचे कौतुक केले आहे तर काहींनी हे खोटे असल्याचे म्हटले आहे. मात्र आनंदानी यांनी मात्र की बाब खरी असल्याचे म्हटले आहे.
