Note Bundle Scam Viral Video: आजच्या डिजिटल जगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. कुणालाही जर काही अनोखे दृश्य दिसलं, धक्कादायक अनुभव आला किंवा असं काही समजलं, जे सगळ्यांना माहिती व्हावं, तर लोक तत्काळ त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकतात. तो व्हिडीओ हजारो-लाखो लोक बघतात, शेअर करतात आणि काही वेळातच तो व्हिडीओ व्हायरल होतो. अशाच एका व्हिडीओने सध्या खळबळ उडवली आहे.
नोटा मोजताना तुम्हीही कधी फसला आहात का? सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा एक व्हिडीओ पाहून तुमचाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. अगदी हुशारीने केलेल्या या खेळीने एका नोटांच्या बंडलातून हजारो रुपये कसे हडपले जाऊ शकतात, हे पाहून लोक थक्क झाले आहेत.
व्हिडीओमध्ये दिसलं काय?
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल दाखवतो. सुरुवातीला तो म्हणतो, “सर्व मिळून / एकूण १०० नोटा आहेत.” पण, पुढे जे उघड होते, ते पाहून तुम्हाला अगदी चक्रावल्यासारखे होईल. तो नोटांचे ते बंडल कॅमेऱ्याजवळ आणतो आणि दाखवतो की, त्या बंडलाच्या मध्यभागी दोन नोटा दुमडून चिकटपट्टीने चिकटवलेल्या आहेत.
आता गमतीची बाब म्हणजे नोटा मोजताना त्या दोन नोटा चार म्हणून मोजल्या जातात. म्हणजेच त्या नोटांच्या बंडलातून मोठा स्कॅम होऊ शकतो. बँक, बाजारपेठ किंवा कुठेही अशा स्वरूपाची फसवणूक होऊ शकते. त्यामुळेच लोकांना हा व्हिडीओ पाहून मोठा धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर खळबळ
हा व्हिडीओ X (माजी ट्विटर) वर @PalsSkit या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “नवा स्कॅम अनलॉक झाला. अशी आयडिया माझ्या डोक्यात का नाही आली?”, काही तासांतच हा व्हिडीओ हजारोंनी पाहिला आणि तो शेअरही केला.
त्यावर एका युजरने मजेशीर कमेंट केली, “एवढं डोकं असतं, तर मीही आज करोडपती झालो असतो.” दुसऱ्याने लिहिले, “खतरनाक आयडिया आहे.” तर तिसऱ्याने थेट प्रतिक्रिया दिली, “हे भगवान.!”
सावधान!
नोटांचे बंडल स्वीकारताना आपण त्यातील नोटा फक्त मोजतो आणि समोरच्यावर सहज विश्वास ठेवतो. पण, या व्हिडीओने दाखवून दिलेय की थोडेसे दुर्लक्ष केल्यास मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. म्हणूनच पुढच्या वेळी नोटांचे बंडल हाती आले, तर नुसती मोजणी न करता, प्रत्येक नोट व्यवस्थित तपासून बघा.
वाचकांना पडणारे संभाव्य प्रश्न
- अजून किती लोकांची अशाप्रकारे फसवणूक झाली असेल?
- बँक वा बाजारात आपल्यासोबतही असे होऊ शकते का?
हे थांबवण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी लागेल?
एकूणच या भन्नाट व्हिडीओने दाखवून दिलेय की, फसवणूक करणाऱ्यांकडे अमर्याद क्लृप्त्या असू शकतात; पण अशा परिस्थितीतही आपण गांगरून न जाता सावध राहणे हाच त्यावर एकमेव पर्याय आहे.