Viral video: चोरी करणं हा गुन्हा आहे. अन् जर का तुम्ही तुम्ही चोरी करताना पकडला गेलात तर तुम्हाला मोठी शिक्षा होऊ शकते. मात्र तरी देखील काही मंडळी झटपट पैसा कमावण्यासाठी गुन्हेगारीचा रस्ता निवडतात. अशाच एका गुन्हेगाराचा व्हिडीओ समोर आला आहे. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे. तुम्हीही प्रवासादरम्यान ट्रेनच्या खिडकी किंवा दरवाजाजवळ मोबाईल वापरत असाल तर सावधान! मात्र यावेळी या चोराला प्रवाशांनी पकडलं असून त्याला चांगलाच धडा शिकवला आहे.
रेल्वेतून मोबाईल चोरणाऱ्या एकाला प्रवाशांनी रंगेहात पकडलं. ट्रेनमधून मोबाईल लांबवून चोरटा पसार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र तितक्यात प्रवाशांनी त्याला पकडलं. प्रवाशांनी चोरट्याला धरून ठेवलं. तितक्यात ट्रेन सुरू झाली आणि चोर धावत्या ट्रेनबाहेर लटकू लागला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.व्हायरल व्हिडीओमध्ये मोबाईल चोर प्रवाशांकडे गयावया करताना दिसत आहे. मला कृपया सोडू नका, धरून ठेवा. अन्यथा मी मरेन, अशा शब्दांत चोरटा प्रवाशांकडे हात न सोडण्यासाठी याचना करत आहे.
प्रवाशांनी चोरट्याचे हात खेचले आणि धरून ठेवलं. थोड्याच वेळात ट्रेन सुटली. ट्रेननं वेग घेतला आणि चोरटा लटकला. रेल्वेनं सुसाट वेग पकडल्यावर चोरट्याची भितीनं गाळण उडाली. माझा हात सोडू नका. नाही तर मी मरेन, अशा शब्दांत त्यानं प्रवाशांना विनंती केली. थोड्या वेळानं प्रवाशांनी चोरट्याला आपत्कालीन खिडकीतून आत खेचलं आणि त्याला यथेच्छ चोप दिला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> मातीच्या भांड्यात बनवायला गेली चमचमीत पदार्थ; काही वेळातच झाला मोठा स्फोट, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया यावर देत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणात चूक कोणाची होती? आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट सेक्शनला नक्की द्या.