एकीकडे रस्ते अपघात वाढत असून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी वाहतूक पोलीस आणि शासन वारंवार नागरिकांना आवाहन करत आहे. परंतु त्यानंतरही नागरिक काही ऐकण्याचे किंवा नियम पाळण्याचे नाव घेत नसल्याने, वाहतूक पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. वाहतूक पोलिसाच्या ‘या’ कृतीनं सर्वांचीच मने जिंकली आहेत. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एरवी पोलीस विनाहेल्मेट कुणी दिसलंच तर लगेच गाडी थांबवून दंड ठोठावतात. मात्र या पोलिसांनी असं काहीच केलं नाही हो. वृद्ध जोडपं विना हेल्मेट प्रवास करत असल्याचं पाहून पोलिसांनी त्यांना थांबवलं पण त्यांना न ओरडता त्यांचं कौतुकच केलंय. तुम्हालाही एकून आश्चर्य वाटलं ना? मग पोलिसांचा हा व्हिडीओ पाहाच

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वयोवृद्ध जोडपं बाईकवरुन जाताना दिसत आहे. त्यांना एक पोलीस कर्मचारी थांबवतात. त्यांची विचारपूस करतात. एवढे वर्ष एकत्र सुखाचा संसार सुरु असल्याने त्यांचे कौतुक करतात. त्यानंतर त्यांना वाहतूकीचे नियम समजवताना दिसत आहे. यावेळी पोलीस कर्मचारी वयोवृद्ध आजीलाही गुलाबाचे फूल देतात. त्यांच्या संसाराला एवढी वर्ष झाली असूनही एकत्र असल्याने त्यांना फूल देऊन ते कौतुक करतात. यानंतर ते आजोबांना एक हेल्मेट देतात.पोलीस वयोवृद्ध आजोबांना हेल्मेट घालण्याचे महत्त्व सांगतात. त्यानंतर त्यांच्या बाईकला लाल रंगाचे रेडियम लावतात. जेणेकरन रात्रीचा प्रवास करणे सुरक्षित होईल.

सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे किंवा सीट बेल्ट न लावता गाडी चालवणे असे प्रकार वाहन चालक सर्रासपणे करत असल्याचे दिसतात. वाढते रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू पाहता काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने वाहतूक नियम मोडणाऱ्या शिक्षेच्या आणि दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. मात्र त्यानंतरही वाहन चालक हे नियम पाळत नसल्याचे पाहायला मिळते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पैसा की प्रेम? तरुणींना विचारला प्रश्न; उत्तरं एकून व्हाल अवाक् VIDEO एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @ajeetbharti या एक्स अकाऊंटवरु शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी भरभरुन कमेंट करत आहेत. सर्वांनीच पोलिसांच्या या कृतीचं कौतुक केलं आहे. व्हिडीओला आतापर्यंत हजारोंमध्ये व्ह्यूज गेले आहेत.