Vardha Viral Video : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक सुधीर खरकाटे यांच्यावर वर्धा शहरातील एका विद्यार्थिनीला मारहाण करून गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडित रुचिका ठाकरे हिने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

वर्ध्यात सार्वजनिक ठिकाणी ही घटना घडली. सुधीर खरकाटे याने मुलीच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरून तिला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर विद्यापीठातील विद्यार्थी आणि वर्ध्यातील स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे, असे जनचौक यांनी सांगितले. सुधीर खरकाटे यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे.

रुचिकाचा दावा आहे की, १७ जानेवारी रोजी एका कारने तिच्या मोटारसायकलला जाणूनबुजून धडक दिली. ती बाईक घेऊन उभी होती आणि खाली पडली. गाडीच्या ड्रायव्हरने गाडीवर काही ओरखडे आहेत का ते तपासायला सुरुवात केली तर रस्त्याने उभे असलेले लोक रुचिकाच्या मदतीला आले.

रुचिकाला खाली पाडलं अन् मारहाण केली

परंतु, त्या व्यक्तीने रुचिकाला धमकावण्यास सुरुवात केली. तिने घरी फोन केला. तोपर्यंत चालकाची पत्नी गाडीतून खाली उतरली आणि रुचिकाशी संवाद साधू लागली. शाब्दिक भांडण सुरू असतानाच त्या व्यक्तीने रुचिकाच्या पायावरून गाडी वळवली. त्यानंतर ते तेथून निघून गेले, असे रुचिकाने तहलका वर्धा न्यूजला सांगितले. तर, व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे रुचिकाला त्या सुरक्षा रक्षकाने थोबाडीत मारली. त्यानंतर तिला खाली पाडूनही तिला मारहाण केली. यामध्ये या सुरक्षा रक्षाची पत्नीही सामिल होती. रुचिकाची आई आणि भाऊ आल्यावर जवळच्या लोकांनी त्यांना कारच्या चालकाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार तो जवळच भाड्याच्या घरात राहतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुचिका आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. एका नातेवाईकाने पोलीस स्टेशन गाठले आणि रुचिका आणि तिच्या कुटुंबीयांना केस मागे घेण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला. तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार रुचिका बाइकर आणि फिटनेसप्रेमी असल्याचं दिसतंय.