मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची मोठी लेक जेनिफर गेट्स हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. पती नायल नासर याने त्याच्या पहिल्या बाळाच्या जन्माची घोषणा केली आहे. यामुळे बिल गेट्स आता आजोबा झाले आहेत. जेनिफर गेट्सने पतीसोबत नवजात बाळाचा हातात घेतलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत ही गोड बातमी दिली आहे.

आमच्या छोट्या निरोगी कुटुंबासाठी प्रेम पाठवा, असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. बिल गेट्स यांनीही तोच फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर करत जेनिफर आणि नायल माता पिता झाल्याने खूप अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. बिल गेट्स यांची विभक्त पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनीही आजी झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

या जगात आपले स्वागत आहे,अशी कमेंट मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी त्यांच्या मुलीच्या पोस्टखाली केली आहे. तसेच माझं ह्रदय ओथंबून वाहत असल्याचेही त्यांनी पुढे लिहिले आहे. जेनिफरची बहीण फोबीनेही नवजात बाळाला शुभेच्छा देत आपला आनंद व्यक्त केला आहे. सुपरमॉडेल मार्था हंट आणि मेकअप आर्टिस्ट मारियो डेडिव्हानोविक यांनीही जेनिफर आणि नायल यांचे अभिनंदन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेनिफर गेट्स आणि नायल नासर यांनी पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. जेनिफरने नायलच्या प्रपोजलबद्दल इंस्टाग्राम पोस्ट शेअर केल्यानंतर या जोडप्याने 2020 मध्ये त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. न्यूयॉर्कमधील वेस्टचेस्टर येथील 142 एकर गेट्स फॅमिली फार्ममध्ये त्यांचे लग्न पार पडले. जेनिफर गेट्सचा प्रियकर नायल नासर हा इजिप्शियन-अमेरिकन व्यावसायिक घोडेस्वार आहे.